हेर असल्याची स्नोडेनची कबुली

By admin | Published: May 29, 2014 04:17 AM2014-05-29T04:17:27+5:302014-05-29T04:17:27+5:30

अमेरिकेतील गोपनीय माहिती प्रसिद्ध करणारा बंडखोर एडवर्ड स्नोडेन याने हेरगिरीचे प्रशिक्षण घेतले होते व गुप्तचर संघटनांसाठी त्याने परदेशात काम केले

Snowden confessed to being a spy | हेर असल्याची स्नोडेनची कबुली

हेर असल्याची स्नोडेनची कबुली

Next

वॉशिंग्टन : अमेरिकेतील गोपनीय माहिती प्रसिद्ध करणारा बंडखोर एडवर्ड स्नोडेन याने हेरगिरीचे प्रशिक्षण घेतले होते व गुप्तचर संघटनांसाठी त्याने परदेशात काम केले, असे स्नोडेननेच एनबीसी न्यूज या अमेरिकन वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. अमेरिकन प्रसिद्धी माध्यमाला स्नोडेनने दिलेली ही पहिली मुलाखत आहे. स्नोडेन हा कंत्राटदार असल्याचे आतापर्यंत मानले जात असे, अमेरिकेने त्याच्यावर हेरगिरीचा आरोप केला होता. या मुलाखतीत त्याने आपण निव्वळ कंत्राटदार कधीच नव्हतो, असे सांगितले. आपण तळापासून वरपर्यंत प्रत्येक पातळीवर काम केले; पण आपले हेरगिरीचेच प्रशिक्षण झाले, असे त्याने सांगितले. गेल्या आठवड्यात दिलेली ही मुलाखत बुधवारी अमेरिकेत प्रसिद्ध होत आहे. अमेरिका सरकारची अनेक गुपिते त्याने बाहेर फोडली. अमेरिकेकडून देशात व देशाबाहेर कशी हेरगिरी चालते त्याचे वर्णन तर अत्यंत स्फोटक ठरले. यामुळे अमेरिकेला आंतरराष्टÑीय पातळीवर स्वत:चा बचाव करावा लागला. माझे प्रशिक्षण हेर म्हणूनच झाले, आंतरराष्टÑीय पातळीवर दुसरे काम करीत असल्याचे दाखवून हेरगिरी करावी लागते. (वृत्तसंस्था) त्यामुळे मी कंत्राटदार बनलो आणि माझे नसलेले काम केले. सीआयएमध्ये तंत्रज्ञ म्हणूनही मी काम केले, तसेच गुप्तचर संघटनेत प्रशिक्षक म्हणूनही काम केले. अमेरिकेने हेरगिरीचा आरोप ठेवलेल्या स्नोडेनने अमेरिकेची हेरगिरी प्रसिद्ध करून अमेरिकेला हादरा दिला होता. रशियाने त्याला आॅगस्ट २०१३ मध्ये राजाश्रय दिला आहे.

Web Title: Snowden confessed to being a spy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.