मंगळावर आढळला बर्फाचा मोठा तुकडा
By admin | Published: September 14, 2015 01:13 AM2015-09-14T01:13:06+5:302015-09-14T01:13:06+5:30
संशोधकांना मंगळ या ग्रहाच्या भूपृष्ठाखाली बर्फाचा विशाल तुकडा आढळला आहे. त्याचा विस्तार कॅलिफोर्निया व टेक्सास या प्रांताच्या आकाराइतका आहे.
वॉशिंग्टन : संशोधकांना मंगळ या ग्रहाच्या भूपृष्ठाखाली बर्फाचा विशाल तुकडा आढळला आहे. त्याचा विस्तार कॅलिफोर्निया व टेक्सास या प्रांताच्या आकाराइतका आहे.
कोट्यवधी वर्षांपूर्वी झालेल्या मोठ्या हिमपाताने हा विशालकाय बर्फाचा भाग निर्माण झाल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. हा बर्फाचा भाग १३० फूट मोठा आहे.
‘नासा’च्या रिकॉनिसा आॅर्बिटर (एमआरओ) वर लावण्यात आलेल्या दोन शक्तिशाली उपकरणांद्वारे ही माहिती आणि आकडेवारी मिळाली. मंगळाच्या भूपृष्ठावरील काही खड्डे वेगळ्या आकाराचे असून, टोपलीच्या आकाराचे नाहीत, असेही संशोधकांना आढळून आले आहे.
अॅरिझोना विद्यापीठाच्या ‘ल्युनार अँड प्लॅनेटरी लॅबोरेटरी’चे सहायक प्रोफेसर शेन बायर्न यांनी सांगितले की, अशा प्रकारचे खड्डे विरळ असतात; पण या भागात अनेक खड्डे आहेत. हे खड्डे वेगवेगळ्या वेळी निर्माण झाले असावेत.
एमआरओच्या हाय रिझोल्युशन्स सायन्स एक्सपेरिमेंट कॅमेऱ्याचा संशोधकांनी उपयोग करून या खड्ड्याचे थ्री डायमेन्शनल मोजमाप केले.