एक मैल लांबीचा बर्फाचा तुकडा
By Admin | Published: February 21, 2017 01:06 AM2017-02-21T01:06:30+5:302017-02-21T01:06:30+5:30
अंटार्टिकावरील झपाट्याने बदलत चाललेल्या पाईन आयलँड ग्लासियरपासून एक मैल (१.६ किलोमीटर) लांबीची बर्फाचा
अंटार्टिकावरील झपाट्याने बदलत चाललेल्या पाईन आयलँड ग्लासियरपासून एक मैल (१.६ किलोमीटर) लांबीची बर्फाचा तुकडा तुटून पडल्याची विलक्षण छायाचित्रे नासाच्या उपग्रहांनी टिपली आहेत. अंटार्टिकावरील बर्फाळ पृष्ठभागाला तडा जाऊन तो वेगळा झाला आहे. पश्चिम अंटार्टिकावरील बर्फाच्या थरापैकी समुद्रात जो बर्फ वाहून जातो त्यात २० टक्के पाईन आयलँड ग्लासियरचा वाटा आहे, असे नासाच्या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
या आधी एखाद्या शहराच्या आकाराएवढा हिमनग पाईन आयलँड ग्लासियरपासून तुटून बाहेर पडला आहे. या हिमनदीपासून बर्फाचा मोठा तुकडा पडला होता तो जुलै २०१५ मध्ये. तेव्हा ५८० चौरस किलोमीटरचा (२२५ चौरस माईल्स) हिमनग पाईन आयलँड ग्लासियरपासून वेगळा झाला होता. हिमनग वेगळा होण्याची ताजी घटना ही अर्थ वॉचिंग लँडसॅट-८ उपग्रहाने २५ ते २९ जानेवारी २०१७ दरम्यान टिपली आहे.