... म्हणून विमानाच्या मागे धावले अफगाणी नागरिक, पसरली होती मोठी अफवा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 11:40 AM2021-08-17T11:40:51+5:302021-08-17T12:03:49+5:30
काबुल विमानतळावर अफगाणिस्तानच्या नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. जो-तो केवळ विमानात बसण्यासाठी गर्दी करत होता. अमेरिकन सैन्य दलाचे हे विमाना काबुलमधून अमेरिकेला जाणार होते.
काबुल - दहशतवादी संघटना तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर आता तिथले नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. लाखो लोकांना अफगाणिस्तान सोडायचा आहे. राजधानी काबुलमधील विमानतळावर मोठी गर्दी आहे. अमेरिकन विमानाला लटकून प्रवास करणाऱ्या अफगाणी नागरिकांचा व्हिडीओ नुकताच समोर आला. ट्विटरवर अनेक सेलिब्रिटी, पत्रकार, प्रसिद्ध नागरिकां हे व्हिडिओ शेअर करत भीषण वास्तव जगासमोर दाखवलं. तसेच, येथील नागरिकांसाठी प्रार्थनाही केली. मात्र, काबुल विमानतळावरच एका अफवेमुळे ही गर्दी झाल्याचं समोर आलं आहे.
काबुल विमानतळावर अफगाणिस्तानच्या नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. जो-तो केवळ विमानात बसण्यासाठी गर्दी करत होता. अमेरिकन सैन्य दलाचे हे विमाना काबुलमधून अमेरिकेला जाणार होते. येथून उड्डाण केलेल्या अमेरिकेच्या विमानाची क्षमता १३४ प्रवाशांची होती. मात्र, त्यात प्रत्यक्षात ८०० जण होते. अमेरिकन हवाई दलाच्या सी-१७ ग्लोबमास्टर विमानाचे फोटो आणि व्हिडीओ कालच सर्वांनी पाहिले. विमान धावपट्टीवरून निघत असताना शेकडो लोक त्याच्या आसपास धावत होते. विमानाला लटकून प्रवास करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. याच प्रयत्नात काही जणांना जीव गेला. आता याच विमानाच्या आतल्या भागातील फोटो प्रसिद्ध झाले आहेत.
As uncertainty hovers over Kabul with the #Taliban at the city gates, here is a look at what’s happening on the streets of #Afghanistan’s capital. https://t.co/j4iK9kxYD3
— Twitter Moments (@TwitterMoments) August 15, 2021
तालिबानने अफगाणिस्तानच्या काबुलवर आणि राष्ट्रपती भवनावर कब्जा केल्यानंतर येथील नागरिकांची चांगलीच दमछाक झाली. अहिंसक पद्धतीने तालिबानने सत्तेचं हस्तांतरण केलं आहे. दरम्यान, सोमवारी अफगाणिस्तानमध्ये एक अफवा पसरली गेली, त्यामुळे अफगाणी नागरिक काबुल विमानतळावर पोहोचले. तालिबानला त्रस्त असलेल्या नागरिकांना अमेरिका आसरा देणार आहे, अशी ही अफवा होती. त्यामुळे, हजारो नागरिक काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. विशेष म्हणजे नागरिकांनी बाहेरील भींतीवरुन उड्या मारुन विमानतळ गाठले होते.