...म्हणून मुलीने वडिलांसोबत ठेवले शरीरसंबंध
By Admin | Published: June 2, 2017 12:15 PM2017-06-02T12:15:37+5:302017-06-02T12:54:39+5:30
वडिलांना दुसऱ्या बायकोपासून दूर ठेवण्यासाठी मुलीने वडिलांसोबत शरिरसंबंध ठेवल्याची घटना घडली आहे.
>ऑनलाइन लोकमत
हाँगकाँग, दि. 2- वडील आणि मुलीचं भावनिक नातं सगळेच अनुभवतात. पण या नात्याबद्दल प्रत्येकालाच ऐकायला विचित्र वाटणारा प्रकार हाँगकाँगमध्ये घडला आहे. तेथे वडिलांना होणाऱ्या दुसऱ्या बायकोपासून दूर ठेवण्यासाठी मुलीनेच त्यांच्यासोबत शरीरसंबंध ठेवल्याची घटना घडली आहे. मुलीला वडिलांनी साखरपुडा केलेली महिला आवडत नसल्याने तसंच त्या दोघांचं लग्न होऊ नये म्हणुन तीने हे पाऊल उचललं आहे. सध्या हाँगकाँगमधील कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.
2009 साली मुलीने वडिलांसोबत दोन वेळा शरीरसंबंध ठेवल्याची माहिती समोर आली आहे. ही मुलगी 26 वर्षीय आहे तर तीचे वडील 58 वर्षांचे आहेत. "मुलगी आपल्या वडिलांकडे आकर्षित झाली होती, म्हणूनच तीने वडिलांना शरीरसंबंधाबद्दल विचारलं होतं आणि वडीलांनीसुद्धा तीच्या मागणीला नकार दिला नाही, असं त्या मुलीच्या वकिलांनी कोर्टात सादर केलेल्या मानसिक अहवालामध्ये नमूद केलं आहे.
साउथ चायना मॉर्निंग पोस्टने ही बातमी प्रसिद्ध केली आहे. मुलगी जेव्हा 19 वर्षांची होती तेव्हा तीने वडिलांसोबत शरीरसंबंध ठेवले होते. विशेष म्हणजे त्या दोघांनी परस्पर सहमतीने सेक्स टेपसुद्धा बनवली होती. या मुलीच्या लहान भावाने बहीण आणि वडिलांची सेक्स टेप पाहिल्यानंतर ही धक्कादायक घटना उघड झाली आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर त्याने पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. पण या गोष्टी दोघांचा सहमतीने सुरू आहेत हे भावाला माहिती नव्हतं.
वडिलांसोबत शरीरसंबंध ठेवल्यास ते त्यांचा साखरपूडा तोडतील असं मुलीला वाटलं होत, असं त्या मुलीच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं आहे. कोर्टामध्ये या मुलीने सगळे आरोप स्वतःवर घेतले. हाँगकाँगमधील या मुलीची ओळख अजून सार्वजनिक करण्यात आलेली नाही. मुलीच्या या कृत्याने सामजाचं कोणतंही नुकसान झालं नाही, म्हणून तीला शिक्षा मिळायला नको, असं वकिलांनी कोर्टात सांगितलं आहे. दरम्यान, कोर्टाने या प्रकरणातील पुढील रिपोर्ट सादर करायला सांगितले आहेत. मुलीला कैदेत न ठेवता शिक्षा दिली जाऊ शकते पण वडीलांना शिक्षेतून मुक्त केलं जाणार नाही, असं मत कोर्टाने व्यक्त केली. याप्रकरणी 12 जून रोजी कोर्ट दोघांना शिक्षा सुनावणार आहे.