...तर भारत, चीनवर दहशतवादी हल्ले करू; ‘आयएसआयएल-के’ने धमकी दिल्याचा संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 07:47 AM2023-02-10T07:47:00+5:302023-02-10T07:47:35+5:30

संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनिओ गुटेरेस यांनी म्हटले आहे की, या संघटनेचा आशियातील काही देशांना मोठा धोका आहे. 

so India, China will be attacked by terrorists UN report on ISIL-K threat | ...तर भारत, चीनवर दहशतवादी हल्ले करू; ‘आयएसआयएल-के’ने धमकी दिल्याचा संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

...तर भारत, चीनवर दहशतवादी हल्ले करू; ‘आयएसआयएल-के’ने धमकी दिल्याचा संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

googlenewsNext

संयुक्त राष्ट्रे : इस्लामिक स्टेट इन इराक ॲण्ड दी लेव्हंट- खोरासान (आयएसआयएल-के) या संघटनेने भारत, इराण, चीन, अफगाणिस्तान या देशांमध्ये दहशतवादी हल्ले चढविण्याची धमकी दिली आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात म्हटले आहे. तालिबान व मध्य, दक्षिण आशियातील संयुक्त राष्ट्रांचे सदस्य देश यांच्यातील संबंध बिघडवण्याचे प्रयत्न या दहशतवादी संघटनेकडून सुरू आहेत. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनिओ गुटेरेस यांनी म्हटले आहे की, या संघटनेचा आशियातील काही देशांना मोठा धोका आहे. 

हजार ते तीन हजार दहशतवादी सक्रिय
या संघटनेचे सुमारे ३ हजार दहशतवादी आशियामध्ये सक्रिय आहेत. त्यातील २०० जण मध्य आशियाच्या देशातील मूळ नागरिक असल्याचे अहवालात म्हटले आहे. 

अनेक ठिकाणी हल्ले
-  अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर भारताने आपल्या राजदूतावासातील अधिकाऱ्यांना परत बोलावले होते. 
-  पण त्यानंतर दहा महिन्यांनी गेल्या वर्षी जून महिन्यात या राजदूतावासात पुन्हा भारतीय अधिकाऱ्यांनी काम सुरू केले आहे. काबूलमध्ये रशियाच्या दूतावासावर हल्ला झाला होता. 
-  त्यानंतर आयएसआयएल-के या संघटनेने काबूलमधील पाकिस्तानचा दूतावास तसेच चिनी नागरिकांचा जिथे राबता असतो त्या हॉटेलमध्येही घातपाती कारवाया केल्या. या संघटनेने मुस्लिमांवर हल्ले केले.
 

Web Title: so India, China will be attacked by terrorists UN report on ISIL-K threat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.