...म्हणून अधिकाधिक मुलांना जन्म दिला पाहिजे, इलॉन मस्क यांनी सांगितलं असं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 03:24 PM2024-06-26T15:24:03+5:302024-06-26T15:25:10+5:30

Elon Musk News: प्रख्यात उद्योगपती इलॉन मस्क हे नुकतेच बाराव्या अपत्याचे पिता बनले आहेत. मस्क यांच्या असलेल्या १२ मुलांमुळे ते सध्या चर्चेचा विषय ठकले आहेत. मात्र मुलांना जन्म देण्याबाबत इलॉन मस्क यांनी एक अजब कारण सांगितलं आहे.

...so more children should be born, said Elon Musk     | ...म्हणून अधिकाधिक मुलांना जन्म दिला पाहिजे, इलॉन मस्क यांनी सांगितलं असं कारण

...म्हणून अधिकाधिक मुलांना जन्म दिला पाहिजे, इलॉन मस्क यांनी सांगितलं असं कारण

प्रख्यात उद्योगपती इलॉन मस्क हे नुकतेच बाराव्या अपत्याचे पिता बनले आहेत. मस्क यांच्या असलेल्या १२ मुलांमुळे ते सध्या चर्चेचा विषय ठकले आहेत. मात्र मुलांना जन्म देण्याबाबत इलॉन मस्क यांनी नेहमीच सकारात्मकतेने विचार केला आहे. तसेच अधिकाधिक मुलांना जन्म देण्याची त्यांची इच्छा असल्याचेही मस्क यांनी म्हटले आहे. इलॉन मस्क यांनी त्यांच्या बाराव्या अपत्याचे स्वागत करताना सांगितलं की,  न्यूरालिंकच्या कर्मचारी शिवोन जिलीस हिच्याकडून जन्माला आलेलं नवं बाळ हे काही सिक्रेट नव्हतं. 
टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क आणि जिलीस यांचं हे तिसरं अपत्य आहे. तत्पूर्वी जिलीस हिने जुळ्या बाळांना जन्म दिला होता. जिलीस न्यूरालिंकमध्ये ऑपरेशन्स आमि स्पेशल प्रोजेक्टची संचालक आहे. इलॉन मस्क यांना पहिली पत्नी जस्टिन हिच्यापासून झालेली पाच मुलं आहेत. तर कॅनेडियन संगितकार ग्राइम्स हिच्यापासून त्यांना तीन मुलं झाली आहेत. दरम्यान, अधिकाधिक मुलांना जन्म देण्याबाबत इलॉन मस्क यांनी खास असं कारण दिलेलं आहे.

इलॉन मस्क यांच्यामते पृथ्वीवर अजूनही खूप कमी लोक आहेत. तसेच ही एक मोठी समस्या आहे. एका कार्यक्रमात मस्क यांनी आपल्या टेस्ला बॉटबाबत बोलताना सांगितले की, केवळ एक बॉटसेनाच कुठलाही आराम भोजन किंवा कुठलीही तक्रार न करता काम करणाऱया कामगारांची व्यावसायिक गरज पूर्ण करू शकते. मात्र जोपर्यंत बॉट सुरू होत नाही तोपर्यंत स्क्विड गेमला अजूनही हाडामासांच्या श्रमिकांची आवश्यकता आहे.  पृथ्वीवर अजूनही पुरेशी माणसं नाही आहेत. कमी जन्मदर हा मानवी संस्कृतीसाठी असलेल्या धोक्यांपैकी एक आहे.

मस्क पुढे म्हणाले की, ज्या लोकांसा आयक्यू चांगला आहे. म्हणजेच जे लोक अधिक बुद्धिमान आहेत. त्यांनी अधिकाधिक मुलांना जन्म दिला पाहिजे. अनेक लोक मुलांना जन्म न देण्याचा निर्णय घेत आहेत. अनेक चांगले आणि स्मार्ट लोक जगातील लोकसंख्या ही प्रमाणाबाहेर वाढल्याचा विचार करत आहेत, असेही मस्क यांनी सांगितले. 

Web Title: ...so more children should be born, said Elon Musk    

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.