..तर मग ‘नॉर्मल’पेक्षा ‘सिझर’च परवडलं!

By Admin | Published: June 14, 2017 05:52 PM2017-06-14T17:52:13+5:302017-06-14T17:52:13+5:30

नवीन तंत्राच्या प्रसुतींसाठी सारी सज्जता असेल तरच त्या मार्गानं जा..

So then the 'Caesar' is better than Normal! | ..तर मग ‘नॉर्मल’पेक्षा ‘सिझर’च परवडलं!

..तर मग ‘नॉर्मल’पेक्षा ‘सिझर’च परवडलं!

- मयूर पठाडे


आजकाल कोणत्याही नवजात बालकाच्या आईला विचारा, ती सांगेल, ‘सिझर’ झालं! नैसर्गिक पद्धतीनं बाळ आता जन्माला येईल की नाही, असं वाटावं, इतक्या वेगानं आता सिझर होताना दिसताहेत. नैसर्गिक प्रसुती झालेली आई मिळणं जवळवजळ दुर्मिळच.

त्यासाठी काय करता येईल, याबाबत जगभर विचारविनिमिय आणि संशोधन चालू आहे. आई पालक, बाबा पालक आणि अगदी प्रसुतीतज्ञांचंही याबाबत समुपदेशन सुरू आहे. आजकाल सगळीकडेच सिझरचं प्रमाण मोठं आहे, यामागे आर्थिक कारण तर आहेच, पण त्यासाठीच्या ‘कळा’ सोसण्याची तयारी आणि वेळही आजकाल अनेकांकडे नाही. सगळ्यांना सगळं काही झटपट हवं.
नवीनच आई होऊ इच्छिणाऱ्या बऱ्याच तरुण मुली तर स्वत:च डॉक्टरांना सांगतात, माझं सिझर करा. एवढं दुखणं सोसायची माझी तयारी नाही, पण माझं बाळ मात्र मला हव्या त्या तारखेला, हव्या त्या वेळेला, ‘मुहुर्ता’वरच जन्माला येऊ द्या, अशी गळही त्या डॉक्टरांना घालतात.

 


संशोधकांचं म्हणणं आहे, प्रसुतीसाठी फोर्सेप आणि व्हॅक्यूम डिलिव्हरीच्या तंत्राचा वापर करताना आलेल्या अडचणी जर नीट हाताळता आल्या नाहीत, तर त्यामुळे होणारा धोका सिझेरिअन प्रसुतीपेक्षा तब्बल पाच पटींनी वाढतो. त्यामुळे बाळाच्या आणि बाळाच्या आईच्या जीवालाही धोका संभवू शकतो.
शास्त्रज्ञांनी त्यासाठी तब्बल दहा वर्षे दोन लाख डिलिव्हरींचा अभ्यास केला. त्यांचा डाटा तपासला. फोर्सेप आणि व्हॅक्यूम डिलिव्हरी तंत्राचा वापर करताना ऐनवेळी आलेल्या अडचणींमुळे सुमारे ८० टक्क्यांपेक्षा जास्त वेळा तज्ञ डॉक्टरांना हस्तक्षेप करावा लागला आणि तातडीची मदत पुरवावी लागली.

Web Title: So then the 'Caesar' is better than Normal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.