... म्हणून 'व्हाईट हाऊस'ने मोदींना ट्विटरवर अनफॉलो केलं, असं आहे अमेरिकेचं राज'कारण'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 11:05 AM2020-04-30T11:05:54+5:302020-04-30T11:06:02+5:30
भारताने हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन मदत केल्यानंतर अमेरिकेने भूमिका बदलल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सोशल मीडियातून टीकाही करण्यात येत आहे.
वॉशिंग्टन - अमेरिकेतील व्हाइट हाऊसने काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवर फॉलो केले होते. मात्र, आता पुन्हा नरेंद्र मोदींनाट्विटरवर अनफॉलो केले आहे. भारताने अमेरिकेला हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषध देऊन मदतीचा हात पुढे केला होता. भारताच्या या मदतीनंतर व्हाइट हाऊसने नरेंद्र मोदी यांच्यासह भारताचे पाच महत्वाच्या ट्विटर हँडलला फॉलो करण्यास सुरुवात केली होती. पंरतु आता पुन्हा सर्वांना अनफॉलो केले असल्याचे समोर आले आहे. याबाबत, आता एका प्रशासकीय अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर याबाबत माहिती दिली आहे.
भारताने हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन मदत केल्यानंतर अमेरिकेने भूमिका बदलल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सोशल मीडियातून टीकाही करण्यात येत आहे. अमेरिकेने अचानकपणे ६ अकाऊंटला अनफॉलो केले आहे. त्यामध्ये, राष्ट्रपती भवन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पंतप्रधान कार्यालय, भारताचे दूतावास आणि भारतातील अमेरिकेचे दूतावास यांना ट्विटरवर फॉलो करण्यास सुरुवात केली होती. मात्र, पुन्हा अनफॉलो केल्यमुळे विविध प्रश्न उपस्थित केले जात आहे. अमेरिकेच्या या भूमिकेवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील नाराजी दर्शवली आहे. राहुल गांधी ट्विट करत म्हणाले की, व्हाइट हाऊसने पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना ट्विटरवरुन अनफॉलो केल्याने मी निराश झालो आहे. या सर्व प्रकरणाची परराष्ट्र मंत्रालय योग्य ती दखल घेईल अशी आशा राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे.
याप्रकरणी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर माहिती दिली आहे. व्हाईट हाऊसचे ट्विटर अकाऊंट सर्वसाधारपणे अमेरिका सरकारचे वरिष्ठ अधिकाऱ्याचे ट्विटर अकाऊंट आणि इतर महत्वाच्या व्यक्तींना फॉलो करते. उदाहरणासाठी, राष्ट्राध्यक्षांच्या विदेशी दौऱ्यावेळी त्या राष्ट्राशी संबंधित दौऱ्याची माहिती, त्यांचे चित्रसंकलन, संबंधित मेसेज रिट्वटि करण्यासाठी संबंधित देशांच्या महत्वाच्या आणि अधिकृत ट्विटर अकाऊंटला फॉलो करण्यात येते. त्यामुळेच, व्हाईट हाऊसने पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भारताशी संबंधित ६ ट्विटर अकाऊंटला फॉलो केले होते. मात्र, आता या सर्वच अकाऊंटला अनफॉलो करण्यात आले आहे.