...तर, महिलांना नोकरी मिळण्याची शक्यता जास्त
By admin | Published: May 23, 2016 03:12 PM2016-05-23T15:12:31+5:302016-05-23T15:12:31+5:30
महिलांना खासगी कंपन्यांमध्ये नोकरीवर ठेवताना विविध मुद्दे विचारात घेतले जातात. त्यात कामाच्या कौशल्याबरोबर वेळेचा मुद्दाही प्रामुख्याने विचारात घेतला जातो.
Next
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. २३ - महिलांना खासगी कंपन्यांमध्ये नोकरीवर ठेवताना विविध मुद्दे विचारात घेतले जातात. त्यात कामाच्या कौशल्याबरोबर वेळेचा मुद्दाही प्रामुख्याने विचारात घेतला जातो. नोकरी मिळवण्यासाठी मुलाखत देताना महिलांनी व्यक्तीगत माहिती देऊ नये असा सल्ला दिला जातो.
पण महिलांनी नोकरीच्या मुलाखतीमध्ये खासगी माहिती दिली तर, त्यांना नोकरी मिळण्याची शक्यता जास्त वाढते असे एका नव्या अभ्यासातून समोर आले आहे. महिलांच्या बायोडाटामध्ये अनेकदा कौटुंबिक किंवा अन्य कारणांमुळे नोकरीच्या वर्षांमध्ये अंतर असते.
नोकरीमध्ये इतकीवर्ष गॅप का पडला त्यासंबंधी खरी तसेच व्यक्तीगत माहिती दिली तर, महिलांना नोकरी मिळण्याची संधी ३० ते ४० टक्क्यांनी वाढते. ज्या महिलांनी व्यक्तीगत माहिती दडवली त्यांची नोकरीची मिळण्याची संधी घटली असे अमेरिकेतील व्हँडरबील्ट विद्यापीठातील प्राध्यापक जॉनी हरस्च यांनी सांगितले.