.. म्हणून त्या लेखकाने खाल्लं स्वतःचं पुस्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2017 08:27 AM2017-06-12T08:27:49+5:302017-06-12T08:28:55+5:30

एका लेखकाने स्वतःचं पुस्तक चावून खाल्लं.

So, that writer has eaten his own book | .. म्हणून त्या लेखकाने खाल्लं स्वतःचं पुस्तक

.. म्हणून त्या लेखकाने खाल्लं स्वतःचं पुस्तक

Next

 ऑनलाइन लोकमत

लंडन, दि. 12- ब्रिटनमध्ये रविवारी एक आश्चर्यकारक घटना घडली. तेथिल एका लेखकाने स्वतःचं पुस्तक चावून खाल्लं. विशेष म्हणजे एका लाइव्ह कार्यक्रमात त्याने हा संपूर्ण प्रकार केला आहे. मॅथ्यू गुडविन असं या लेखकाचं नाव आहे.
 
ब्रिटनमध्ये नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीबाबत वर्तविलेला अंदाज चुकल्याने त्यांनी हा प्रकार केल्याचं सांगितलं आहे. या निवडणुकीत लेबर पार्टीला ३८ टक्क्यांहून कमी मतं मिळतील, असा दावा गुडविन यांनी केला होता. मात्र त्यांचा हा अंदाज चुकला आणि लेबर पार्टीला ४०.३ टक्के मतं मिळाली.  लेबर पार्टीला ३८ टक्क्यांहून जास्त मतं मिळतील असं मला वाटलं नव्हतं, असं मत लेखकाने व्यक्त केलं आहे. मॅथ्यू गुडविन हे लेखक प्राध्यापक असून ते युनिव्हर्सिटी ऑफ केंटमध्ये शिकवतात. ‘ब्रेक्झिट व्हाय ब्रिटेन वॉण्टेड टू लिव्ह यूरोपियन युनियन’ या पुस्तकाचे ते सहलेखक आहेत. याच पुस्तकाची पानं त्यांनी चावून खाल्ली. मात्र गुडविन यांनी ही पानं गिळली नाहीत, असं स्काय न्यूजने स्पष्ट केलं आहे. 
 
ब्रिटनच्या निवडणुकांबद्दल अंदाज चुकल्यानंतर गुडविन यांनी ट्विट केलं होतं. स्काय न्यूजवर 4.30 वाजता होणाऱ्या कार्यक्रमात मी माझं पुस्तक खाइन, असं गुडविन यांनी म्हंटलं होतं. त्यांचं हे ट्विट खरंच ते सत्य करून दाखवतात का यासाठी स्कायन्यूजने प्रोफेसर-लेखक गुडविन यांना कार्यक्रमात बोलावलं. त्याचं कार्यक्रमात गुडविन यांनी पुस्तकाची पानं फाडून ती चावून खाल्ली.  या संदर्भातील एक व्हिडीओसुद्धा स्काय न्यूजने जारी केला आहे. 
 
मी माझा शब्द राखणारा व्यक्ती आहे. म्हणूनच ट्विटरवर सांगितल्या प्रमाणे मला आधी पुस्तकाची पानं खाऊ द्या, मग तुम्ही कार्यक्रम सुरू करा, असं त्या कार्यक्रमाच्या अँकरला गुडविन यांनी सांगितलं. 
 

Web Title: So, that writer has eaten his own book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.