मुलांना व्यसन लावणाऱ्या पाेस्टवर येणार बंदी, न्यूयाॅर्कमध्ये विधेयकाला मंजुरी, पाेस्ट दाखविण्यासाठी हवी आईवडिलांची संमती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 06:29 AM2024-06-11T06:29:49+5:302024-06-11T06:30:44+5:30
Social Media: लिकडच्या काळात लहान मुलांमध्ये साेशल मीडिया आणि माेबाइलचे प्रचंड वेड लागलेले दिसते. हे व्यसन माेडून काढण्यासाठी अमेरिकेत कायदेशीर पावले उचलण्यात येत आहे. मुलांना व्यसन लागू शकेल, अशा साेशल मीडियावरील साहित्यावर बंदी घालण्यासंदर्भात न्यूयाॅर्कच्या सिनेटने विधेयक मंजूर केले आहे.
न्यूयाॅर्क - अलिकडच्या काळात लहान मुलांमध्ये साेशल मीडिया आणि माेबाइलचे प्रचंड वेड लागलेले दिसते. हे व्यसन माेडून काढण्यासाठी अमेरिकेत कायदेशीर पावले उचलण्यात येत आहे. मुलांना व्यसन लागू शकेल, अशा साेशल मीडियावरील साहित्यावर बंदी घालण्यासंदर्भात न्यूयाॅर्कच्या सिनेटने विधेयक मंजूर केले आहे. गव्हर्नर कॅथी हाेचूल यांनी त्यावर स्वाक्षरी केल्यानंतर विधेयकाचे रूपांतर कायद्यात हाेईल.
विधेयकानुसार, १८ वर्षांखालील मुलांना व्यसनी पाेस्ट दाखविता येणार नाही. मुले ज्यांना फाॅलाे करतात, त्याच खात्यांवरील पाेस्ट त्यांना दिसतील. व्यसनी पाेस्ट आईवडिलांच्या सहमतीनंतरच अल्पवयीन मुलांना दाखविता येतील. (वृत्तसंस्था)
जाहिराती दाखवून अब्जावधी डाॅलरची कमाई
साेशल मीडिया कंपन्या जाहिराती दाखवून पैसे कमावतात. हार्वर्ड विद्यापीठाच्या संशाेधनानुसार, २०२२मध्ये साेशल मीडिया कंपन्यांनी अल्पवयीनांना जाहिराती दाखवून सुमारे ९१८ अब्ज रुपये कमावले.
इन्स्टाग्राम आणि फेसबुकची मूळ कंपनी मेटाने गेल्या वर्षी काही सुविधा सादर केल्या हाेत्या. त्यांच्या मदतीने मुले साेशल मीडियावर किती वेळ घालवताे, यावर आईवडील नियंत्रण ठेवू शकतात.
टेक कंपन्यांचा विराेध
- न्यूयाॅर्कमधील टेक उद्याेगाने या विधेयकाचा विराेधक केला आहे. असंवैधानिक पद्धतीने साेशल मीडिया आणि वेबसाइट्सवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न आहेत.
- अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा हा प्रकार असल्याचे या क्षेत्रातील उद्याेजकांचे म्हणणे आहे.
व्यसनी पाेस्ट म्हणजे काय?
साेशल मीडियावरील अशा पाेस्ट ज्या पाहून मेंदू उत्तेजित हाेताे, त्यास व्यसनी पाेस्ट म्हणतात. अशा पाेस्ट पाहिल्यानंतर मेंदूमध्ये एक विशिष्ट प्रकारचे उत्तेजक घटक निर्माण हाेताे. हा पदार्थ सतत निर्माण हाेत राहिल्यास एक प्रकारचे व्यसन लागते.