अवघ्या ७२ लाख डॉलरला रशियानं अमेरिकेला विकलं आपलं सुंदर राज्य; वाचा यामागची रंजक गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 16:26 IST2021-07-03T16:26:24+5:302021-07-03T16:26:53+5:30
जगात एक अनोखं राज्य आहे की जे अमेरिकेनं चक्क रशियाकडून विकत घेतलं होतं. राज्याच्या क्षेत्रफळानुसार आज हे राज्य संयुक्त राज्य अमेरिकेत समाविष्ट असलेल्या ५० राज्यांपैकी सर्वात मोठं राज्य आहे.

अवघ्या ७२ लाख डॉलरला रशियानं अमेरिकेला विकलं आपलं सुंदर राज्य; वाचा यामागची रंजक गोष्ट
एखादं राज्य सर्वसाधारणपणे तेव्हाच एखाद्या देशाचं भाग होतं जेव्हा त्या राज्याला एखाद्या युद्धात जिंकलेलं असतं. त्यानुसारच ते एखाद्या देशाचं ते भाग बनलेलं असतं. प्रत्येक राज्यामागे युद्धाचा इतिहास असतो. पण जगात एक अनोखं राज्य आहे की जे अमेरिकेनं चक्क रशियाकडून विकत घेतलं होतं. राज्याच्या क्षेत्रफळानुसार आज हे राज्य संयुक्त राज्य अमेरिकेत समाविष्ट असलेल्या ५० राज्यांपैकी सर्वात मोठं राज्य आहे.
अमेरिकेनं रशियाकडून विकत घेतलेल्या या राज्याचं नाव आहे अलास्का. या राज्याचं नाव रशियन साम्राज्यापासून आहे तसचं ठेवण्यात आलं आहे. अमेरिकेनंही ते रशियाकडून विकत घेतल्यानंतर बदललं नाही. अलास्काचा अर्थ होतो एक महान भूमी. अलास्काच्या पूर्वेकडे कॅनडा, उत्तरेकडे आर्टिक महासागर आणि दक्षिण-पश्चिम प्रांतात विस्तारलेला प्रशांत महासागर आहे. तर पश्चिमेकडे रशिया आहे.
१३ वर्षीय चिमुकल्यानं डिझाइन केला होता अलास्काचा ध्वज
रशियाच्या जार अलेक्झांडर द्वितीय यानं अलास्का राज्य अमेरिकेला विकलं होतं. दरम्यान अलास्कामधील जनता त्यावेळी या कराराच्या विरोधात होती. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. त्यामुळे अमेरिका आपला देश असल्याचं स्वीकारण्यासाठी अलास्कामधील जनतेला खूप वेळ गेला.
अलास्का स्थित जोनऊ आइस फील्ड हा जगातील सर्वात मोठ्या बर्फाच्छादीत भूभागांपैकी सातव्या क्रमाकांचा भूभाग मानला जातो. याचं क्षेत्रफळ सुमारे १५०० वर्ग किलोमीटर इतकं आहे. यात जवळपास दरवर्षी १०० फूट बर्फाचा वर्षाव होतो. अतिशय उंच ठिकाण असल्यानं उन्हाळ्यातही अतिशय कमी प्रमाणात इथं बर्फ वितळतो.
अलास्काचा ध्वज एका १३ वर्षीय मुलानं डिझाइन केला होता. बेनी बेनसन्स असं त्या मुलाचं नाव होतं. १९२७ साली राज्याच्या ध्वजासाठी एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात बेनी बेनसन्स विजयी ठरला होता आणि त्याला पारितोषिक म्हणून १००० डॉलरची स्कॉलरशीप देखील प्रदान करण्यात आली होती.