सरोगसीतून जन्मलेल्या मुलास जन्मजात दोषामुळे सोडून दिले

By Admin | Published: August 7, 2014 02:13 AM2014-08-07T02:13:26+5:302014-08-07T02:13:26+5:30

थाई सरोगेट मदरच्या पोटी जन्मलेल्या आपल्या मुलाला ‘डाऊन्स सिंड्रोम’ (गुणसूत्रतील दोषाने होणारा विकार) असल्याने ऑस्ट्रेलियन जोडप्याने त्याला सोडून दिले.

The son of the Sarogsi had given up due to the birth pains | सरोगसीतून जन्मलेल्या मुलास जन्मजात दोषामुळे सोडून दिले

सरोगसीतून जन्मलेल्या मुलास जन्मजात दोषामुळे सोडून दिले

googlenewsNext
>पर्थ : थाई सरोगेट मदरच्या पोटी जन्मलेल्या आपल्या मुलाला ‘डाऊन्स सिंड्रोम’ (गुणसूत्रतील दोषाने होणारा विकार) असल्याने ऑस्ट्रेलियन जोडप्याने त्याला सोडून दिले. आंतरराष्ट्रीय पातळीवर याचे तीव्र पडसाद उमटून सरोगसीचा मुद्दा पुन्हा तापला आहे. 
ऑस्ट्रेलियातील डेव्हिड व वेंडी फारनेल या जोडप्याने थायलंडमधील पट्टारामोन चानुबा या सरोगेट मदरद्वारे आपल्या जुळ्या अपत्यांना जन्म दिला होता. जुळ्यापैकी मुलगी सुदृढ होती, तर मुलाला डाऊन्स सिंड्रोम होता. हा एक घातक विकार आहे. त्यामुळे डेव्हिड, वेंडी यांनी मुलाला थायलंडमध्येच सोडले व ते केवळ मुलीला सोबत घेऊन ऑस्ट्रेलियाला परतले. ही घटना उजेडात आल्यानंतर थायलंडसह जगभर खळबळ उडाली. 
जैविक माता-पित्यांनी डाऊन्स सिंड्रोन असल्यानेच मुलाला वा:यावर सोडून दिल्याचा आरोप सरोगेट मदर पट्टारामोनने केला. आपण या मुलाचा सांभाळ करणार असल्याचेही तिने सांगितले. 
दुसरीकडे ऑस्ट्रेलियन दाम्पत्याने सरोगेट मदरने दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. मुलाला जन्मजात हृदयदोष असल्याची कल्पना होती; मात्र त्याला डाऊन्स सिंड्रोम असल्याचे आपणास ज्ञात नव्हते, असे या दाम्पत्याने म्हटले आहे. 
गॅमी (डाऊन्स सिंड्रोम असलेले बालक) जन्मतच: खूप आजारी होते. ते जास्त दिवस जगू शकणार नसल्याचे त्याच्या जैविक माता-पित्याला सांगण्यात आले होते.  मात्र, तेथे संघर्ष सुरू झाल्याने गॅमीशिवाय परतण्याखेरीज त्यांच्याकडे अन्य कोणताही पर्याय उरला नव्हता, असेही या मित्रने सांगितले.  
या जुळ्यांचा जन्म थायलंडमधील एका आंतरराष्ट्रीय रुग्णालयात होणार होता; मात्र पट्टारामोन दुस:या एका रुग्णालयात दाखल झाल्यामुळे सरोगसी कराराचा भंग होऊन ऑस्ट्रेलियन दाम्पत्याला मुलांवर कायदेशीर हक्क उरला नव्हता. तथापि, सरोगेट मदर अखेरीस मुलीला आमच्या स्वाधीन करण्यास राजी झाली. मुलाला आपल्यासोबत नेता न आल्याने जैविक माता-पित्याला खूप वेदना झाल्या. ते त्याला सोडून देऊ इच्छित नव्हते; मात्र, मुलगीही गमावण्याचा धोका असल्याने ते अत्यंत जड अंत:करणाने गॅमीला सोडून मायदेशी परतले, असे या दाम्पत्याच्या एका मित्रने सांगितले.(वृत्तसंस्था)
 
 
 
 जुळ्याच्या जन्मानंतर जैविक माता-पित्याने गॅमीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप सरोगेट मदरने केला होता. या दाम्पत्याने तो आरोपही फेटाळून लावला. आम्ही जन्मानंतर प्रथम मुलांना पाहण्यासाठी गेलो, तेव्हा आम्ही दोघांसाठीही भेटवस्तू नेल्या होत्या, असे हे दाम्पत्य म्हणाले. आम्ही गॅमी वाचावा यासाठी प्रार्थना केली; मात्र डॉक्टरांनी डाऊन्स सिंड्रोममुळे नाही तर फुफ्फुस, हृदयदोष व संसर्गामुळे त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले होते. डेव्हिड व वेंडीने थायलंडमध्ये दोन महिने वास्तव्य केले; मात्र तेथे संघर्ष सुरू झाल्याने त्यांना गॅमीला तेथेच सोडून परतावे लागले. 
 
4थायलंडमधील घटनेने आंतरराष्ट्रीय सरोगसीच्या नैतिक व कायदेशीर आधारावर चर्चेला तोंड फुटले आहे. व्यावसायिक सरोगसीत महिलेला दुस:या दाम्पत्याचे मूल आपल्या उदरात वाढविण्यासाठी पैसे दिले जातात. 

Web Title: The son of the Sarogsi had given up due to the birth pains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.