स्रोडेनची प्रेयसी रशियात
By admin | Published: October 13, 2014 02:50 AM2014-10-13T02:50:46+5:302014-10-13T02:50:46+5:30
स्रोडेनच्या वकिलाने हे जाहीर केले आहे. स्रोडेनची दीर्घकाळची प्रेयसी अमेरिकन नृत्यांगना लिंडसे मिल्स जुलै महिन्यातच मॉस्कोला आली आहे,
मॉस्कोे : अमेरिकेची अनेक गुपिते बाहेर फोडून देशाला संकटात आणणारा अमेरिकी बंडखोर, ज्याला जगातील कोणताही देश आश्रय देण्यास तयार नसताना, रशियाने आश्रय दिला आहे, त्याला भेटण्यासाठी त्याची मैत्रीण, प्रेयसी अमेरिके हून रशियात आली आहे. प्रेम म्हणजे प्रेम असतं, त्याला जगाचे नीतिनियम लागू नसतात, हाच संदेश तिने आपल्या कृतीने दिला आहे.
स्रोडेनच्या वकिलाने हे जाहीर केले आहे. स्रोडेनची दीर्घकाळची प्रेयसी अमेरिकन नृत्यांगना लिंडसे मिल्स जुलै महिन्यातच मॉस्कोला आली आहे, असे स्रोडेनच्या वकील अनातोली कुचेरिना यांनी जाहीर केले आहे. लिंडसेला रशियाचा व्हिसा मर्यादित काळाचा असल्याने, ती अमेरिकेला जाऊन परत येते. स्रोडेनला सध्या मानसिक आधाराची गरज आहे, त्याकाळात प्रेयसी त्याला साथ देत आहे. स्रोडेन व लिंडसे हवाई येथे राहत असत.
सध्या ते रशियात फिरत आहेत. शुक्रवारी स्रोडेनवरील माहितीपट न्यूयॉर्क येथे रात्री उशिरा दाखविण्यात आला. त्यात लिंडसे स्रोडेनसोबत असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर लिंडसे व स्रोडेनच्या सहनिवासाचे वृत बाहेर फुटले आहे. लिंडसेने आपल्या ब्लॉगवर जगप्रवास करीत असल्याचे लिहिले आहे.