कोर्टाने ३ लोकांना सुनावली १०५ वर्षांची शिक्षा, असा काय केला होता त्यांनी गुन्हा?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 06:10 PM2021-09-04T18:10:45+5:302021-09-04T18:17:20+5:30
कोलमॅन म्हणाले की, गुन्हेगारांना शिक्षा मिळाल्याने नैसर्गिक संपत्तीच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या लोकांचा आत्मविश्वास वाढला आहे.
दक्षिण आफ्रिकेतील एका कोर्टाने ३ लोकांना १०५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दक्षिण आफ्रिकन नॅशनल पार्क सॅनपार्क्सने ३ शिकाऱ्यांना १०५ वर्ष तुरूंगवासाची शिक्षा सुनावल्याचं स्वागत केलं आहे. स्कुकुजा रीजनल कोर्टाने गुरूवारी मोजाम्बिकच्या २९ वर्षीय शांगनी मथेबुला आणि ३२ वर्षीय इमॅनुअल मधलुलीसोबत ५८ वर्षीय दक्षिण आफ्रिकन हेंड्रिक मॅगनेला क्रूगर नॅशनल पार्कमध्ये तीन गेंड्यांच्या हत्येसाठी शिक्षा सुनावली. त्यांना २०१७ मध्ये अटक करण्यात आली होती.
क्रूगर नॅशनल पार्कचे अधिकारी कोलमॅन शुक्रवारी म्हणाले की, गुन्हेगारांना मिळालेली शिक्षा त्या लोकांसाठी उदाहरण ठरेल जे आपल्या नैसर्गिक गोष्टींचं नुकसान करण्याचं काम करतात. किंवा तसा विचार करतात. (हे पण वाचा : ८ अब्ज रूपयांपेक्षा जास्त किंमतीच्या दागिन्यांची चोरी करणारे अटकेत, हिऱ्याची तलवार घेऊन झाले होते फरार)
ते पुढे म्हणाले की, ते देशाच्या नॅशनल पार्कची सुरक्षा करणं सुरूच ठेवतील. गेल्या काही महिन्यात पार्कमधील सुरक्षा आणि देखरेख वाढवली गेली आहे. यासाठी मोठ्या मेहनतीची गरज आहे. कायद्यालाही आपलं काम करावं लागेल.
कोलमॅन म्हणाले की, गुन्हेगारांना शिक्षा मिळाल्याने नैसर्गिक संपत्तीच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या लोकांचा आत्मविश्वास वाढला आहे. असे लोक जीव आणि झाडांची सुरक्षा करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करतात. दक्षिण आफ्रिकेत गेंड्यांच्या शिकारीवर बंदी आहे. तरी काही लोक शिकार करतात. अशांना अशीच शिक्षा मिळणं योग्य आहे.