प्रेमाच्या त्रिकोणातून शत्रूची हत्या करून हृदयच खाल्ले दक्षिण आफ्रिकेतील घटना : घरात घुसण्यास पोलीसही धास्तावले

By admin | Published: June 12, 2014 10:05 PM2014-06-12T22:05:01+5:302014-06-12T22:05:01+5:30

केप टाऊन : साऊथ आफ्रिकेमध्ये प्रेमाच्या त्रिकोणातून एक भयंकर घटना घडली. महिलेच्या एका प्रियकराने दुसर्‍याची केवळ हत्याच केली नाही, तर धारदार चाकूने त्याचे हृदय काढून ते भक्षणही केले.

South African incident killed by enemy of love by trick of love: Police also threaten to enter the house | प्रेमाच्या त्रिकोणातून शत्रूची हत्या करून हृदयच खाल्ले दक्षिण आफ्रिकेतील घटना : घरात घुसण्यास पोलीसही धास्तावले

प्रेमाच्या त्रिकोणातून शत्रूची हत्या करून हृदयच खाल्ले दक्षिण आफ्रिकेतील घटना : घरात घुसण्यास पोलीसही धास्तावले

Next
प टाऊन : साऊथ आफ्रिकेमध्ये प्रेमाच्या त्रिकोणातून एक भयंकर घटना घडली. महिलेच्या एका प्रियकराने दुसर्‍याची केवळ हत्याच केली नाही, तर धारदार चाकूने त्याचे हृदय काढून ते भक्षणही केले.
केप टाऊन शहरातील गुगुलेथू भागात हा थरारक प्रकार घडला. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा आरोपी हत्या केलेल्या व्यक्तीचे हृदय निवांतपणे खात होता. आरोपी हा झिम्बाब्वेचा नागरिक आहे. प्रेमाच्या त्रिकोणात केंद्रस्थानी असलेल्या महिलेने पोलिसांना सांगितले की, माझा माजी प्रियकर मी सध्याच्या जोडीदारासोबत राहत असलेल्या घरी आला. त्यांनी एकमेकांशी गप्पा मारल्या. थोड्या वेळाने माजी प्रियकराने पैसे देऊन मद्य आणण्यासाठी पाठवले. मी घरी परतले तेव्हा माझ्या जोडीदाराची हत्या झाल्याचे मला आढळून आले. घरातील आरडोओरडीने शेजारी लोक धावून आले. त्यांनी खिडकीतून डोकावले असता आरोपी हत्या केलेल्या व्यक्तीचे हृदय चाकूने बाहेर काढून खात असल्याचे त्यांना दिसले. ही घटना अत्यंत भयंकर होती. आम्ही त्याला हे थांबव, असे ओरडूओरडू सांगत होतो; मात्र त्याने आमचे ऐकले नाही, असे एका शेजार्‍याने सांगितले. पोलीस घटनास्थळी आले, तेव्हा त्यांचीही घरात जाण्याची हिंमत झाली नाही. त्यांनी अतिरिक्त कुमक बोलावली. प्रेमाच्या त्रिकोणातून ही हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

Web Title: South African incident killed by enemy of love by trick of love: Police also threaten to enter the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.