९/११ नंतर दक्षिण अशियाई अडचणीत
By Admin | Published: September 11, 2014 02:22 AM2014-09-11T02:22:37+5:302014-09-11T02:22:37+5:30
अमेरिकेत ९ सप्टेंबर २०११ रोजी दहशतवादी हल्ला होऊन १३ वर्षे झाली तरीही दक्षिण आशियाई विशेषत: मुस्लिम, शीख, हिंदू व अरब नागरिकांविरुद्ध अमेरिकेत प्रतिकूल वातावरण वाढतच आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकेत ९ सप्टेंबर २०११ रोजी दहशतवादी हल्ला होऊन १३ वर्षे झाली तरीही दक्षिण आशियाई विशेषत: मुस्लिम, शीख, हिंदू व अरब नागरिकांविरुद्ध अमेरिकेत प्रतिकूल वातावरण वाढतच आहे.
साऊथ एशियन अमेरिकन्स लिडिंग टुगेदरने (साल्ट) आपल्या ‘अंडर सस्पिशियन, अंडर अॅटॅक’ या मथळ्याच्या अहवालात म्हटले आहे की, जानेवारी २०११ ते एप्रिल २०१४ दरम्यान राजकीय नेत्यांची व सरकारी अधिकाऱ्यांच्या वक्तव्यांमुळे देशभर परदेशी नागरिकांबद्दल वाटणारा तिरस्कार किंवा भीतीतून होणाऱ्या हिंसाचाराच्या १५० घटना घडल्या आहेत, असे संबंधित दस्तावेजाच्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. राजकीय नेत्यांनी परदेशी नागरिकांचा तिरस्कार होईल अशी वक्तव्ये व शेरेबाजी करण्याच्या प्रकारांत वार्षिक ४० टक्के वाढ झाली आहे. साल्टने २०१० मध्ये शेवटचे विश्लेषण जाहीर केले होते. वांशिक द्वेषातून होणाऱ्या हिंसाचाराच्या अनेक घटनांची नोंदही होत नाही. देशभर अशा घटनांचा शोध घेण्यात आला असता त्या केवळ ८० च हाती लागल्या. त्यातही मुस्लिमांच्या विरोधातील घटना जास्त होत्या.
वांशिक द्वेषातून होणारा हिंसाचार न्यूयॉर्क सिटी, न्यू जर्सी मेट्रोपोलिटन एरिया, चिकागो आणि त्याचा परिसर, दक्षिण आणि उत्तर कॅलिफोर्नियामध्ये जास्त प्रमाणात होत असल्याचे अहवालात म्हटले आहे. कॅपिटोल हिल येथे हा अहवाल प्रसिद्धीस देण्यात आला. (वृत्तसंस्था)