"आमच्यावर हल्ला कराल तर..."; छोट्याशा शेजारी देशाचा चीनला थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 02:42 PM2020-08-28T14:42:45+5:302020-08-28T14:59:04+5:30
दक्षिण समुद्रातील वादग्रस्त भागात सध्या चीन आणि अमेरिका दोन्ही देश सैन्याची ताकद वाढवू लागले आहेत. यानंतर आता एका छोट्या देशाने चीनला थेट इशारा दिला आहे.
दक्षिण चीन समुद्रात सुरू असलेल्या युद्धाभ्यासावेळी अमेरिका आणि चीनमध्ये तणाव वाढू लागला होता. यावर चीनने आपल्या सैनिकांना नरमाईचे आदेश दिले असून अमेरिकी सैन्य़ावर कोणत्याही परिस्थितीत पहिली गोळी चालवू नका, असे निर्देश दिले आहेत. अमेरिकेचे आरोग्य मंत्री चार दशकांनंतर तैवानच्या दौऱ्यावर असताना चीनचे हे आदेश आले आहेत. दक्षिण समुद्रातील वादग्रस्त भागात सध्या चीन आणि अमेरिका दोन्ही देश सैन्याची ताकद वाढवू लागले आहेत. यानंतर आता एका छोट्या देशाने चीनला थेट इशारा दिला आहे.
फिलीपीन्सने चीनला इशाला दिला आहे. चीनने आमच्या नौदलावर हल्ला केला तर आम्ही अमेरिकेची मदत घेऊन असं फिलीपीन्सने म्हटलं आहे. फिलीपीन्सचे परराष्ट्र मंत्री टेओडोरो लोकसिन यांनी चीनने आमच्यावर हल्ला केला तर आम्ही अमेरिकेबरोबर केलेल्या सुरक्षा करारानुसार त्यांची मदत घेऊ असं म्हटलं आहे. याआधी फिलीपीन्सचे राष्ट्रपती रोड्रिगो डुटेर्टे यांनी देशातील सरकार या वादामध्ये अमेरिकेची मदत घेणार नाही असं म्हटलं होतं.
फिलीपीन्स आणि चीनमध्ये दक्षिण चीनच्या समुद्रातील सीमेवरुन सुरू असणाऱ्या वादातूनच मनीलामधून पेइचिंगला हा इशारा देण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. परराष्ट्र मंत्री लोकसिन यांनी आमच्या वायुसेनेची विमाने या पुढेही दक्षिण चीनच्या समुद्रावर नजर ठेवतील. फिलीपीन्सने दिलेला हा इशारा म्हणजेच उगाच आम्हाला प्रवृत्त करण्याचा प्रकार असल्याचे चीनने म्हटले आहे. आम्ही अनधिकृत काम करत असल्याचा त्यांचा दावा आहे. आम्ही त्यांची विचारसरणी बदलू शकत नाही. आधीच ते न्यायालयामध्ये पराभूत झालेत असं देखील लोकसिन यांनी म्हटलं आहे.
CoronaVirus News : ...अन् लोकांना सहन करावा लागला मनस्ताप, जाणून घ्या नेमकं काय घडलं?https://t.co/hVNU8yWjIQ#coronavirus#CoronaUpdates#COVID19#MadeinChina#China
— Lokmat (@MiLOKMAT) August 26, 2020
चीनने आमच्या जहाजांवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला तर आम्ही अमेरिकन लष्कराची मदत घेऊ असं लोकसिन यांनी म्हटलं आहे. मात्र नक्की कोणत्या परिस्थितीमध्ये अमेरिकेची मदत घेतली जाईल याबद्दल लोकसिन यांनी थेट माहिती दिलेली नाही. लोकसिन यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. अमेरिका आणि चीनमध्ये दक्षिण चीन समुद्रातील हालचालींवरुन वाढ वाढत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण, जाणून घ्या नेमकं काय आहे 'हे' प्रकरण?https://t.co/o5Zf21zCkW#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia
— Lokmat (@MiLOKMAT) August 25, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : कोरोनाचा धसका! अचानक लोक झाले गायब, 'या' गावातील 90 टक्के घरांना टाळं
"मुंबई पोलीस आयुक्तांना निलंबित करा", भाजपा आमदाराचं थेट मोदींना पत्र
CoronaVirus News : लढ्याला यश! कोरोना लसीच्या चाचणीनंतर आनंदाची बातमी, 'हा' डोस ठरतोय संजीवनी
'चीनसोबत युद्ध झालं तर पाकिस्तानशीही युद्ध निश्चित', पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा
"केंद्र सरकारचा निष्काळजीपणा चिंताजनक"; कोरोना लसीवरून राहुल गांधींचा हल्लाबोल म्हणाले...