कालपर्यंत २४ वर्षाचा होता, आज २२ वर्षाचा झाला! दक्षिण कोरियात लोकांच वय का कमी होतंय?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 04:46 PM2023-06-28T16:46:27+5:302023-06-28T16:47:47+5:30
दक्षिण कोरियामध्ये लोकांचे वय एक ते दोन वर्षांनी कमी झाले आहे.
वय अशी गोष्ट आहे जी नेहमी वाढत असतं. पण, वाढत्या वयामुळे आपल्याला ताणही येतो. आपल्याला नेहमी वाटत असत आपलं वय वाढू नये, सध्या दक्षिण कोरियामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. दक्षिण कोरियातील नागरिकांचे वय २ वर्षांनी कमी झाले आहे.
दक्षिण कोरियामध्ये वय मोजण्याची पारंपारिक पद्धत बंद झाली आहे. आता तिथेही तीच व्यवस्था स्वीकारली जाईल, जी जगभर स्वीकारली जाते. त्यामुळे तेथील लोक एक ते दोन वर्षांनी लहान झाले आहेत. म्हणजेच कालपर्यंत कोणाचे वय २४ वर्षे होते, तर आज तो २३ किंवा २२ वर्षांचा झाला आहे. आता तेथूनही जन्मतारखेपासून वयाची मोजणी केली जाणार आहे. तर आतापर्यंत असे होत होते की २४ तासांत मुलांचे वय दोन वर्षांनी वाढायचे.
वय मोजायची व्यवस्था काय होती?
दक्षिण कोरियामध्ये वयाची गणना इतर देशांपेक्षा खूपच वेगळी आहे. येथे वय मोजण्यासाठी 'कोरियन वय' प्रणाली होती. या प्रणालीनुसार, जन्माच्या वेळी मुलाचे वय एक वर्ष मानले जात असे. तर वर्ष बदलले की त्याचे वय आणखी एक वर्ष वाढायचे.
समजा ३१ डिसेंबरला मूल जन्माला आले असेल तर त्यावेळी त्याचे वय कोरियन वय प्रणालीनुसार एक वर्ष असेल. दुसऱ्याच दिवशी म्हणजे १ जानेवारीला ते मूल दोन वर्षांचे होईल. म्हणजेच तिथे मुलाचे वय २४ तासात दोन वर्षे होईल. - कारण तिथल्या पारंपारिक पद्धतीनुसार जन्मतारीख ऐवजी वर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच १ जानेवारीपासून वय मोजले जाते.
वय मोजण्याच्या तीन पद्धती आहेत
१. कायदेशीर आणि प्रशासकीय हेतूंसाठी, दक्षिण कोरियामध्ये फक्त आंतरराष्ट्रीय प्रणालीद्वारे वय मोजणी केली जाते.
२. मुलाच्या जन्माच्या वेळी, त्याचे वय ० मानले जाते, पण जसजसे वर्ष बदलते, म्हणजेच जानेवारी येताच त्याचे वय एक वर्षाचे होते.
३. मुलाचा जन्म होताच मुलाचे वय एक वर्ष मानले जाते. आणि जेव्हा जानेवारी येतो तेव्हा त्याच्या वयात आणखी एक वर्ष वाढते. म्हणजेच डिसेंबरमध्ये जन्मलेले मूल जानेवारीत दोन वर्षांचे होते. उदाहरणार्थ- जर एखाद्या व्यक्तीचा जन्म 28 जून २००३ रोजी झाला असेल, तर आंतरराष्ट्रीय पद्धतीनुसार त्याचे वय १९ वर्षे असेल, पण दुसऱ्या पद्धतीनुसार ते २० वर्षे आणि तिसऱ्या पद्धतीनुसार २१ वर्षे असेल.