दक्षिण कोरियानंतर डोनल्ड ट्रम्प चीनमध्ये, उत्तर कोरियावर काय चर्चा करणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2017 01:53 PM2017-11-08T13:53:53+5:302017-11-08T13:56:53+5:30
डोनल्ड ट्रम्प सध्या आशिया-पॅसिफिक दौऱ्यावर आहेत. जपानमध्ये पंतप्रधान शिंजो अबे यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केल्यानंतर ते दक्षिण कोरियाला गेले होते. त्यानंतर आता ते आज चीनमध्ये पोहोचले आहेत. चीनमध्ये कोणत्या महत्त्वाच्या विषयांचा चर्चेमध्ये समावेश करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Next
ठळक मुद्देसर्व जगाने विरोध आणि निषेध केला तरी उत्तर कोरियाने आपल्या अणूचाचण्या सुरुच ठेवल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात केलेल्या अणू क्षेपणास्त्राच्या सहाव्या चाचणीनंतर हे अस्त्र जपानला पार करुन गेल्याचे व आता अमेरिका आमच्या टप्प्यात असल्याचा दावा उत्तर कोरियाने केला उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी एकमेकांवर अनेकवेळा तीव्र टीका केली आहे.
बीजिंग-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प सध्या आशिया-पॅसिफिक दौऱ्यावर आहेत. जपानमध्ये पंतप्रधान शिंजो अबे यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केल्यानंतर ते दक्षिण कोरियाला गेले होते. त्यानंतर आता ते आज चीनमध्ये पोहोचले आहेत. चीनमध्ये कोणत्या महत्त्वाच्या विषयांचा चर्चेमध्ये समावेश करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Leaving South Korea now heading to China. Looking very much forward to meeting and being with President Xi!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) November 8, 2017
उत्तर कोरियाचा अणू कार्यक्रम आणि तेथिल हुकूमशहा किम जोंग उन सर्वांच्या चिंतेचा मुद्दा बनला आहे. त्यामुळे उत्तर कोरियावर सर्वच देशांनी जास्तीत जास्त बंधने आणावित यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे. उत्तर कोरियाचे 90 %आर्थिक अस्तित्त्व चीनवर अवलंबून असल्यामुळे डोनल्ड ट्रम्प यांना कोरियाविरोधी शिष्टाई चीनमध्ये करावी लागणार आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबाबतीत ट्रम्प यांनी सकारात्मक भूमिका घेत त्यांची अध्यक्षपदी पुनर्निवड झाल्यावर त्यांचे अभिनंदनही केले होते.
जपान आणि दक्षिण कोरियामध्ये उत्तम आदरातिथ्य अनुभवल्यानंतर ट्रम्प यांचे त्याहून चांगले आदरातिथ्य करण्यासाठी जिनपिंग सरसावले आहेत. ट्रम्प आणि जिनपिंग "फॉरबिडन सिटी"लाही भेट देणार आहेत. दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर असताना तेथिल संसदेला संबोधित करताना ट्रम्प यांनी उत्तर कोरियावर अत्यंत तीव्र शब्दांमध्ये टीका केली होती. उत्तर कोरियामध्ये अत्यंत निंदनीय शासन असल्याचा प्रहारच त्यांनी या भाषणामध्ये केला. तसेच उत्तर कोरिया हा एक पंथ असल्याप्रमाणे चालवला जात असल्याचीही टीका त्यांनी केली.
Together, we dream of a Korea that is free, a peninsula that is safe, and families that are reunited once again! pic.twitter.com/9tsZRCC83j
— Donald J. Trump (@realDonaldTrump) November 8, 2017
सर्व जगाने विरोध आणि निषेध केला तरी उत्तर कोरियाने आपल्या अणूचाचण्या सुरुच ठेवल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात केलेल्या अणू क्षेपणास्त्राच्या सहाव्या चाचणीनंतर हे अस्त्र जपानला पार करुन गेल्याचे व आता अमेरिका आमच्या टप्प्यात असल्याचा दावा उत्तर कोरियाने केला होता. उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी एकमेकांवर अनेकवेळा तीव्र टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी जपान, दक्षिण कोरिया आणि चीन या उत्तर कोरियाच्या शेजारी देशांमध्ये दौरा करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. उत्तर कोरियाविरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न ते या दौऱ्याच्या पहिल्या दिवसापासून करत आहेत.