स्पेनच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्र्यांचे निधन
By admin | Published: April 10, 2017 01:39 AM2017-04-10T01:39:48+5:302017-04-10T01:39:48+5:30
स्पेनच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री कारमेन चॅकान यांचे रविवारी निधन झाले
Next
>ऑनलाइन लोकमत
माद्रिद, दि. 10 - स्पेनच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री कारमेन चॅकान यांचे रविवारी निधन झाले. ४६ वर्षीय चॅकान ह्या पूर्वी सोशलिस्ट पार्टीच्या अध्यक्ष पदाच्या दावेदार होत्या. त्यांच्या अकाली मृत्यूच्या कारणाचा तपशील अद्याप जाहीर झाला नसला, तरी त्यांचा मृत्यू ह्रदयकविकाराच्या धक्क्याने झाला असल्याचे स्थानिक वृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. २00८ ते २0११ दरम्यान स्पेनचे संरक्षणमंत्री राहिलेल्या चॅकान २0११मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत थोड्या फरकाने पराभूत झाल्या होत्या.