कोरोनाचा राजघराण्यातील पहिला बळी, महाराणी मारिया यांनी घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 11:49 AM2020-03-29T11:49:40+5:302020-03-29T11:55:32+5:30
मारिया यांचे बंधू राजकुमार एनरिक दे बॉरबॉन यांनी फेसबुक पोस्टद्वारे यासंदर्भात माहिती दिली. येत्या शुक्रवारी मारिया यांच्यावर माद्रिद येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. मारिया यांनी पॅऱिसमध्ये अखेरचा श्वास घेतला.
नवी दिल्ली - स्पेनचे राजे फिलीप IV यांची चुलत बहिण आणि बॉरबॉन-पार्मीच्या राजकुमारी मारिया टेरेसा यांचे शनिवारी कोराना व्हायरसमुळे निधन झाले. त्या ८६ वर्षांच्या होत्या. कोरोनाच्या राजघराण्यातील मारिया पहिल्या बळी ठरल्या. मारिया मागील तीन दिवसांपासून व्हेटीलेटरवर होत्या.
मारिया यांचे बंधू राजकुमार एनरिक दे बॉरबॉन यांनी फेसबुक पोस्टद्वारे यासंदर्भात माहिती दिली. येत्या शुक्रवारी मारिया यांच्यावर माद्रिद येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. मारिया यांनी पॅऱिसमध्ये अखेरचा श्वास घेतला.
कोरोना व्हायरसमुळे स्पेनमध्ये हाहाकार माजला आहे. मागील २४ तासात स्पेनमध्ये ८४४ लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनामुळे झालेल्या मृतांचा आकडा आता ५ हजार ९८२ वर पोहोचला आहे. देशात कोरोनाने तिसरी स्टेप पार केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच पुढील काही दिवसात कोरोनाचा कहर कमी होईल, असा दावा त्यांनी केला आहे.
स्पेनमध्ये कोरोना बधितांची संख्या आता ७३ हजारहून अधिक झाली आहे. संपूर्ण जगात इटलीनंतर सर्वाधिक मृत्यू स्पेनमध्ये झाले आहेत. इटलीत आतापर्यंत १० हजारहून अधिक लोकांना कोरोना व्हायरसमुळे जीव गमवावा लागला आहे. अनेक देशांत कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउन करण्यात आले आहे. तरी देखील दिवसेंदिवस कोरोना बधितांची संख्या वाढतच असल्याचे चित्र आहे. यातून शाही घराणे देखील सुटले नसल्याचे दिसत आहे.