Video: एका लग्नाची भन्नाट गोष्ट! युगुलाने बाल्कनीत आणाभाका घेतल्या, शेजारीही तसेच सहभागी झाले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 08:50 PM2020-03-22T20:50:48+5:302020-03-22T20:55:12+5:30
Corona virus स्पेनमध्ये सरकारने लॉकडाऊन केले आहे. कोरुना शहरातील एका सोसायटीमध्ये अनोखा विवाहसोहळा पार पडला.
कोरुना: वर्षभरापासून लग्नाच्या बेडीत अडकण्याची इच्छा असलेल्या स्पेनच्या युगुलाने कोरोनामुळे अजब तऱ्हेने लग्न केले. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांच्या शहराचे नाव कोरूना आहे. त्यांनी घराच्या खिडकीमध्ये उभे राहून लग्न केले आहे. या अजब लग्नाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या तरुणाने खिडकीत उभे राहून प्रेयसीसोबत लग्न केले. त्याने त्याच्या सोसायटीमधील एकाला खिडकीत उभे राहून लग्न सोहळ्याचे नेतृत्व करण्यास सांगितले. तसेच दुसऱ्या एका शेजाऱ्याला त्याने साक्षीदार राहण्यास सांगितले.
कोरुना शहरातील एका सोसायटीमध्ये अनोखा विवाहसोहळा पार पडला. नवरदेव डॅनिअल केमिना आणि नवरी अल्बा डियाज हे आम्ही अखेर लग्न केले, असे किंचाळत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या शेजाऱ्यांनी आपापल्या बाल्कनीमध्ये उभे राहून लग्नसोहळ्याला हजेरी लावली.
जोडप्याला याच दिवशी लग्न करायचे होते, पण त्यांचे अशा प्रकारे लग्न होईल असे वाटले नव्हते. लग्नाची तारीख लांबवायचीही नव्हती. स्पेनमध्ये कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. यामुळे लग्न थाटामाटात करायचे नव्हते. कारण असे केल्यास कोनोना पसरण्याची भीती होती. कारण पाहुणेमंडळी येणार मग त्यांच्या स्वागताची व्यवस्था, जेवणाची, बसण्याची व्यवस्था करणे आणि त्यांना कोरोनापासून दूर ठेवणे हे खूप जिकीरीचे होते. यामुळे दोघांनी हा निर्णय घेतला.
स्पेनमध्ये सरकारने लॉकडाऊन केले आहे. यामुळे घराच्या बाल्कनीमध्ये उभे राहून शेजाऱ्यांच्या उपस्थितीत लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे डॅनिअलने सांगितले. शेवटी अल्बाच्या चेहऱ्यावरील आनंद खूप महत्वाचा होता, असे ही डॅनिअल म्हणाला.
आश्चर्य! चार दिवस रोज फक्त दोन गोळ्या, कोरोनामुक्त झाली महिला डॉक्टर
...अन् पाकिस्तान भीक मागू लागला; म्हणाला 'कर्जमाफी करा'!