बलुचिस्तानवर बोलून मोदींनी धोक्याची सीमारेषा ओलांडली- पाकिस्तान
By Admin | Published: August 18, 2016 06:58 PM2016-08-18T18:58:52+5:302016-08-18T18:58:52+5:30
रेंद्र मोदी यांनी काश्मीरच्या मुद्द्यावर बोलताना जबरदस्तीनं बलुचिस्तानवर उघडपणे बोलून धोक्याची सीमारेषा ओलांडली आहे
ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 18 - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरच्या मुद्द्यावर बोलताना जबरदस्तीनं बलुचिस्तानवर उघडपणे बोलून धोक्याची सीमारेषा ओलांडली आहे, असं वक्तव्य पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या नफिस झकेरिया यांनी केलं आहे.
पुढील महिन्यात संयुक्त राष्ट्रसंघात आम्ही काश्मीरचा मुद्दा पूर्ण ताकदीने उचलून धरू, असे वक्तव्य केलं आहे.
गेल्या वर्षी पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्रात हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यामुळे आम्ही पुन्हा ताकदीनिशी त्या मुद्द्यावर बोलणार असल्याचं म्हणत परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या नफीस झकेरिया मोदींना इशारा दिला आहे.
कराची आणि बलुचिस्तानातील अनेक कारवायांमध्ये भारताचा असल्याचा आरोपही पाकिस्ताननं केला आहे. काश्मीरमधील मानवी हक्काच्या उल्लंघनाचा मुद्दा दडपण्यासाठी भारताने जाणीवपूर्वक हा मुद्दा उपस्थित केल्याचं यावेळी नफिस झकेरिया यांनी सांगितलं आहे.