टिकटॉकवर भीक मागण्याचा 'लाइव्ह' धंदा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 12:16 PM2023-04-21T12:16:01+5:302023-04-21T12:20:07+5:30
"प्लीज लाइक, शेअर, प्लीज गिफ्ट' चा टीकटॉकवर बाजार
आज सोशल मीडियाचे अनेक प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत. टिकटोक हा त्यातलाच एक प्लॅटफॉर्म टिकटॉक है माध्यम प्रामुख्याने स्वतःचे व्हिडीओ शेअर करण्यासाठी वापरलं जातं. त्यातही काही लोक त्यावरचे इन्फ्लुएन्सर्स असतात. त्यांना लाखो-करोडो फॉलोअर्स असतात. त्यावर फॅशन, जीवनशैली, प्रवास, रेसिपी, नाच, गाणी असे अनेक व्हिडीओ बघायला मिळतात. पण त्याहीपलीकडे 'टिकटॉकचा उपयोग केला जातो आणि तो उपयोग आहे.
भीक मागण्यासाठी सीरियामधलं युद्ध सुरु झालं त्याला ११ वर्ष होऊ गेली. या अकरा वर्षांमध्ये सीरियातील अनेक कुटुंबांची अक्षरशः वाताहत झाली. अनेकजण देश सोडून स्थलांतरित झाले. पण जे मागे राहिले त्यांना रोजगाराची साधनं फारशी उरली नाहीत कारण या युद्धामुळे सीरियाची अर्थव्यवस्थाच ढासळली. अनेक कुटुंबांवर जगण्यासाठी भीक मागायची पाळी आली, पण सगळ्याच व्यवस्था कोलमडून पडलेल्या या देशात भीक देणार तरी कोण? भीक देण्यासाठी तरी पैसे कोणाकडे आहेत? असा प्रश्न निर्माण झाला. आणि त्यात व्यावसायिक संधी शोधली ती चीनमधल्या टिकटॉक मिडलमन लोकांनी, हे मध्यस्थ इतर लोकांना टिकटोंक कन्टेन्ट तयार करण्यासाठी प्रोत्साहित करतात, त्यासाठी लागणारं मार्गदर्शन देतात, जी मदत लागेल ती करतात आणि त्याबदल्यात त्या टिकटोंक अकाउंटमध्ये जे पैसे येतात त्यातून आपलं कमिशन घेतात.
या मिडलमन लोकांनी सीरियातील शरणार्थी कॅम्पमधल्या काही कुटुंबांना हेरलं आणि त्यांना टिकटॉकवरून पैसे उभे करण्यासाठीचं मार्गदर्शन दिलं. आणि मग ही सीरियन निर्वासित कुटुंब दिवसातले तासचे तास टिकटॉकवर लाइव्ह येऊन भीक मागायला लागली. त्यांच्या घरातलं दारिद्र्य दाखवायचं, मुलांचे कसे हाल होतात ते दाखवायचं, त्यांच्या उपचारांसाठी पैसे मागायचे असं त्या कुटुंबांनी सुरू केलं. हे ज्या कुटुंबांनी सुरू केलं त्यांच्याकडे जगण्यासाठी दुसरा काही मार्गच उरला नव्हता. शिवाय टिकटोंक लाइव्ह जाण्यासाठी देशाबाहेर जाण्याची गरज नव्हती, लोक पैसे देऊ लागले त्यामुळे त्यांना ते फार सोयीचं वाटलं. पण हा सगळा प्रकार कोणालातरी गरज होती, त्यांनी आपलं अकाउंट उघडलं, लोकांकडे मदत मागितली आणि लोकांनी मंदत केली. इतका सरळ सोपा नव्हता. त्यात या मध्यस्थ लोकांनी फार वेगळी गणितं होती.
मध्यस्थ लोकांनी सगळ्यांत पहिल्यांदा काय केले, तर या सीरियन कुटुंबांना ब्रिटिश नंबर्स मिळवून दिले. कारण टिकटोकवर तुम्हाला सामान्यतः तुमच्या आजूबाजूची अकाउंट्स जास्त दाखवली जातात, म्हणजेच सीरियामधील नंबरवर तयार केलेले व्हिडीओ सीरियामध्येच दाखवले गेले असते. त्यातून फार पैसे मिळाले नसते. त्यामानाने हे मध्यस्थ लोक म्हणतात की ब्रिटिश लोक फार जास्त उदार आहेत. ते जास्त पैसे देतात. म्हणून ब्रिटनमधली सीमकार्डस घेण्यात आली.
या सगळ्या प्रकारात हे मध्यस्थ लोक तर त्यांचा हिस्सा घेतातच, पण त्याहून धक्कादायक भाग असा आहे की या व्हिडीओजमधून लोक जे काही पैसे देतात त्यातला मोठा हिस्सा टिकटोंक ही कंपनी स्वतःसाठी ठेवून घेते आणि मोठा म्हणजे किती मोठा? तर ही कंपनी तब्बल ७० टक्के - पैसे स्वतःसाठी ठेऊन घेते, म्हणजे या जगण्यासाठी पैसे मागणान्या लोकांना जर का कोणी ५०० रुपये पाठविले तर टिकटॉकवर रोज लाइव्ह जाणाऱ्या लोकांमध्ये मोना अली अल-करीम आणि च्या सहा मुलींचं कुटुंब आहे. मोनाचा नवरा एका हवाई हल्ल्यात मारला गेला. मोनाची शरीफा नावाची मुलगी दृष्टिहीन आहे. ते सगळे तिच्या शस्त्रक्रियेसाठी पैसे जमवतायत. त्यासाठी ते रोज अनेक तास टिकटॉकवर लाईव्ह येतात आणि त्यांच्या झोपडीच्या जमिनीवर बसून शिकवलेली इंग्लिश वाक्य प्लीज लाइक, प्लीज शेअर, प्लीज गिफ्ट' अशी म्हणत राहतात.
टिकटोंक त्यातून ७० रुपये काढून घेते आणि फक्त ३० रुपये त्या टिकटोंकच्या अकाउंटला पाठविते. त्यानंतर जे पैसे उरतात त्यातले १० टक्के तिथला पैसे काढून देणारा लोकल माणूस काढून घेतो. त्याशिवाय मध्यस्थाला त्यातले ३५ टक्के द्यावे लागतात. असं करता करता त्या गरजू कुटुंबापर्यंत १०० रुपयातले जेमतेम १८-१२ रुपये पोचतात.
याबद्दल माध्यमांनी आरडाओरडा केल्यावर टिकट्रॉकने या प्रकारची दाखल घेतली आहे आणि अशी अकाउंट्स आणि ही पद्धत आम्ही बंद करणार आहोत असेही त्यांनी म्हटले आहे. अशी अकाउंट्स आणि अशी पद्धत बंद केल्याने टिकटॉफची प्रतिमा कदाचित थोडीशी सुधारेल, पण सीरियातल्या त्या निराधार कुटुंबांचे काय होणार हा प्रश्न अनुत्तरितच राहील.