अमेरिकेत उंदरांसाठी खास कॅफे
By admin | Published: May 23, 2017 06:59 AM2017-05-23T06:59:17+5:302017-05-23T06:59:17+5:30
तुम्ही उंदरांशी मैत्री करू इच्छिता? असे म्हटल्यावर बहुतांश लोक नकारार्थी मान हलवतील. त्याचे कारण म्हणजे बहुतेकांना उंदरांची एकतर किळस येते
नवी दिल्ली : तुम्ही उंदरांशी मैत्री करू इच्छिता? असे म्हटल्यावर बहुतांश लोक नकारार्थी मान हलवतील. त्याचे कारण म्हणजे बहुतेकांना उंदरांची एकतर किळस येते किंवा मग भीती वाटते. ‘स्टुअर्ट लिटिल’ हा चित्रपट पहाताना उंदरांशी मैत्री करावी, असे आम्हाला अनेकदा वाटले. तर मुद्दा असा की, तुम्ही जर उंदरांशी मैत्री करू इच्छित असाल तर हा कॅफे त्यासाठी दुवा ठरू शकतो. तसे पाहता एखाद्या कॅफेत किंवा उपाहारगृहात तुम्हाला उंदीर दिसल्यास तुम्ही तेथून पटकन निघून जाता. मात्र, अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को शहरात मुषकराजाला मुक्त प्रवेश असलेला कॅफे लवकरच उघडणार आहे. या कॅफेत तुम्ही उंदरांसोबत बसून केवळ कॉफीचा आस्वाद घेऊ शकत नाहीतर त्यांच्याशी मैत्रीही करू शकतात. एवढेच नाहीतर एखादा उंदीर आवडल्यास त्याला तुम्ही दत्तकही घेऊ शकता. या कॅफेचे नाव ‘द ब्लॅक कॅट कॅफे’ आहे.