अमेरिकेत 'टुडे आय एम अ मुस्लिम, टू' रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Published: February 20, 2017 04:29 PM2017-02-20T16:29:33+5:302017-02-20T17:02:19+5:30

अमेरिकेच्या प्रशासनानं प्रवेशबंदीचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ आज न्यू यॉर्कमधल्या टाइम्स स्क्वेअर इमारतीजवळ दहा हजारोंच्या संख्येनं लोकांनी रॅली काढली

Spontaneous response to 'Today I am a Muslim, Two' rally in America | अमेरिकेत 'टुडे आय एम अ मुस्लिम, टू' रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

अमेरिकेत 'टुडे आय एम अ मुस्लिम, टू' रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next

ऑनलाइन लोकमत
न्यू यॉर्क, दि. 20 - सात मुस्लिम देशांतील नागरिकांवर अमेरिकेच्या प्रशासनानं घातलेल्या प्रवेशबंदीच्या निर्णयाच्या निषेधार्थ आज न्यू यॉर्कमधल्या टाइम्स स्क्वेअर इमारतीजवळ दहा हजारोंच्या संख्येनी लोकांनी रॅली काढली आहे. यावेळी रॅलीमध्ये सहभागी झालेल्या अमेरिकन नागरिकांनी एका गाण्याच्या माध्यमातून मुस्लिमांच्या सोबत असल्याचा संदेशही दिला आहे.

या रॅलीत अमेरिकेतील काही अभिनेते, दिग्दर्शक, व्यावसायिक, राजकारण्यांनीही सहभाग नोंदवला आहे. रसेल सिमॉन्स आणि सुसन सॅरांडोन यांनीही या रॅलीत सहभागी होत ट्रम्प यांच्या मुस्लिम प्रवेश बंदीचा निषेध नोंदवला आहे. देशातील मुस्लिम भयभीत झाले असल्याने त्यांच्या विषयी सद्‌भावना व्यक्त करण्यासाठीच या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं, असंही रॅलीच्या आयोजकांनी सांगितलं आहे.

मुस्लिमांवरील बंदी हटवा, आम्हीही मुस्लिम आहोत असे समजा, ट्रम्प यांचा आम्ही द्वेष करतो, असे फलक आंदोलनकर्त्यांनी झळकावले आहेत. यात न्यूयॉकचे महापौर बिल डे ब्लासिओ हेही सहभागी झाले.

ते म्हणाले, सर्वधर्माचा आदर करण्यासाठी अमेरिकेची स्थापना झालीय. अमेरिकेतील नागरिक मुस्लिमांच्या विरोधात आहेत अशी जी जनभावना निर्माण केली जात आहे ती पुसून टाकण्याची गरज आहे. न्यू यॉर्क शहराचा प्रमुख या नात्याने सर्वांना एक संदेश देऊ इच्छितो की, तुम्ही कोणत्याही धर्माचे, वंशाचे किंवा तुमचा जन्म कोठेही झालेला असला तरी हा देश कायम तुमचा आहे आणि तुमचाच राहील. एखाद्या विशिष्ट धर्मावर हल्ला करणे म्हणजे सर्वच धर्मावरील हल्ला समजला गेला पाहिजे, असे ते म्हणाले. जगातील 160 कोटी मुस्लिम शांतताप्रिय आहेत. मी स्वतःलाही अभिमानाने मुस्लिमच समजतो, अशीही भावना बिल डे ब्लासिओ यांनी व्यक्त केली आहे. 

 

Web Title: Spontaneous response to 'Today I am a Muslim, Two' rally in America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.