मोठी बातमी! 'स्पुतनिक-व्ही' लसीची ऑगस्टपासून भारतात निर्मिती, मे अखेरपर्यंत ३० लाख डोस आयात होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 02:04 PM2021-05-22T14:04:53+5:302021-05-22T14:05:44+5:30

भारतात मे महिन्याच्या अखेरपर्यंत रशियाच्या स्पुतनिक-व्ही (Sputnik-V) लसीचे एकूण ३० लाख डोस आयात होणार आहेत.

Sputnik expected to start vaccine production in India from August | मोठी बातमी! 'स्पुतनिक-व्ही' लसीची ऑगस्टपासून भारतात निर्मिती, मे अखेरपर्यंत ३० लाख डोस आयात होणार

मोठी बातमी! 'स्पुतनिक-व्ही' लसीची ऑगस्टपासून भारतात निर्मिती, मे अखेरपर्यंत ३० लाख डोस आयात होणार

Next

भारतात मे महिन्याच्या अखेरपर्यंत रशियाच्या स्पुतनिक-व्ही (Sputnik-V) लसीचे एकूण ३० लाख डोस आयात होणार आहेत. तर जूनपर्यंत ५० लाख डोस आयात केले जातील असा दावा रशियातील भारताचे राजदूत डी.बाला व्यंकटेश वर्मा यांनी केला आहे. याशिवाय 'स्पुतनिक-व्ही' लसीची निर्मिती ऑगस्ट महिन्यापासून भारतातच होण्याची शक्यता असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे. भारतात निर्मितीला सुरुवात झाल्यास देशात मोठ्या प्रमाणात लसीचे डोस उपलब्ध होतील. (Sputnik expected to start vaccine production in India from August)

कोरोना विरोधी लसींमध्ये केवळ एक डोस घ्यावा लागणाऱ्या 'स्पुतनिक-लाइट' (Sputnik Light) लसीसाठी देखील भारताने रशियाला प्रस्ताव पाठवला आहे. भारताकडून या लसीसाठी मंजुरी मिळणं अद्याप बाकी आहे. तर स्पुतनिक-व्ही लसीची आयात भारतातील हैदराबाद येथील डॉ रेड्डीज लॅबरॉटरी कंपनीकडून केली जात आहे. 

भारतात ८५ कोटींहून अधिक स्पुतनिक-व्ही लसीची निर्मिती करण्याची योजना आहे. सध्या देशात दोन टप्प्यात एकूण २ लाख १० हजार लसीचे डोस रशियातून आले आहेत. भारताने १२ एप्रिल रोजी रशियाच्या स्पुतनिक-व्ही लसीच्या वापराला मंजुरी दिली होती. डॉ. रेड्डीज लॅबरॉटरीनं स्पुतनिक-व्ही लसीसाठी रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंडसोबत (RDIF) करार केला होता. भारतीय बाजारात स्पुतनिक-व्ही लसीच्या एका डोसची किंमत ९९५ रुपये इतकी आहे. कोरोना विषाणू विरोधात स्पुतनिक-व्ही लसीची परिणामकारकता ९० टक्क्यांहून अधिक आहे. 
 

Web Title: Sputnik expected to start vaccine production in India from August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.