Sri Lanka Crisis: श्रीलंकेतून पळालेल्या राष्ट्रपतींना मालदिवनं प्रवेश नाकारला, मग एक फोन आला अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 01:59 PM2022-07-13T13:59:01+5:302022-07-13T14:00:24+5:30

Sri Lanka Crisis: अभूतपूर्व राजकीय आणि आर्थिक संकटाच्या परिस्थितीत श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी राजीनामा न देताच देशातून पलायन केलं आहे.

sri lanka crisis gotabaya rajapaksa got helped from maldivian speaker mohamed nasheed all you need to know | Sri Lanka Crisis: श्रीलंकेतून पळालेल्या राष्ट्रपतींना मालदिवनं प्रवेश नाकारला, मग एक फोन आला अन्... 

Sri Lanka Crisis: श्रीलंकेतून पळालेल्या राष्ट्रपतींना मालदिवनं प्रवेश नाकारला, मग एक फोन आला अन्... 

Next

Sri Lanka Crisis: अभूतपूर्व राजकीय आणि आर्थिक संकटाच्या परिस्थितीत श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी राजीनामा न देताच देशातून पलायन केलं आहे. यामुळे देशातील आक्रोश आणखी वाढला आहे. आता तर राजपक्षे यांनी राजीनामा न देण्यामागचं कारण देखील त्यांच्या देशातील एग्झिट प्लानचा एक भाग असल्याचं सांगितलं जात आहे. श्रीलंकेतून पळ काढण्यासाठी गोटबाया राजपक्षे यांनी आपल्या पदाचा वापर केल्याचं म्हटलं जात आहे. 

गोटबाया राजपक्षे रात्री उशिरा सैन्याच्या एका विमानातून आपल्या पत्नीसह कुटुंबातील काही सदस्यांसोबत मालदीवला पोहोचले आहेत. सकाळी जेव्हा श्रीलंकेतील नागरिकांना कळालं की राष्ट्रपती अचानक देश सोडून पळून गेलेत त्यानंतर जनआक्रोश आणखी वाढला. खरंतर राजपक्षे यांनी पदावरुन पायऊतार व्हावं अशी जनतेचीच मागणी होती. पण तसं न करता ते देश सोडून निघून गेल्यानं संताप व्यक्त केला जात आहे. गोटबाया राजपक्षे यांनी राजीनामा न देताच पळ काढल्यामुळे आता देशात नव्या सरकारच्या निवडीची प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण होणार आहे. 

पदाचा वापर करुन गोटबाया पळाले?
गोटबाया राजपक्षे यांनी अजूनही राष्ट्रपती पदाचा राजीनामा दिलेला नाही. यामागचं कारण आता हळूहळू स्पष्ट होऊ लागलं आहे. गोटबाया राजपक्षे यांनी याआधीच आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं होतं. ते श्रीलंकेतून सुरक्षितरित्या बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यांनी जर राष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला असता तर तसं शक्य झालं नसतं. 

आता राजपक्षे यांना देशाच्या लष्करानं बाहेर पडण्यास मदत केल्यानं श्रीलंकेच्या हवाई दलावरही प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. यानंतर हवाई दलाला देखील स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे. संरक्षण मंत्रालयाच्या आदेशानुसार राष्ट्रपतींसाठी विशेष विमानाची व्यवस्था करावी लागली. देशाच्या संविधानातील नमूद कायद्यानुसारच आम्ही त्यांना विमान उपलब्ध करुन दिलं, असं श्रीलंकेच्या हवाई दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं. 

मोलदीवचे माजी सभापती आणि राष्ट्रपती मदतीला धावले...
७३ वर्षीय गोटबाया राजपक्षे मालदीवला पोहोचल्यानंतर एक मोठी माहिती समोर आली. गोटबाया राजपक्षे यांना श्रीलंकेतून बाहेर पडण्यासाठी मालदीवच्या संसदेचे सभापती आणि माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांनी मदत केली. राजपक्षे अजूनही श्रीलंकेचे राष्ट्रपती आहे. त्यांनी राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत ते जर मालदीवला येत असतील तर त्यांना मनाई करता येणार नाही, असं मालदीव सरकारनं म्हटलं आहे. एकूण मिळून १३ जण गोटबाया यांच्यासोबत मालदीवला पोहोचले आहेत. हे सर्वजण AN32 विमानानं पोहोचले आहेत. 

श्रीलंकेच्या हवाई दलाचं विमान जेव्हा मालदीवला पोहोचले तेव्हा मालदीवच्या नागरी उड्डाण प्राधिकरणानं विमानाच्या लँडिंगला परवानगी दिली नव्हती. त्यानंतर सभापती नशीद यांच्या एका फोननंतर विमानाचं लँडिंग मालदीवमध्ये करण्यात आलं. यानंतर मालदिव नॅशनल पार्टीच्या संसदीय समितीनं सरकारनं श्रीलंकेच्या राष्ट्रपतींना परवानगी का दिली याची माहिती संसदेत देणार असल्याचं सांगितलं आहे. 

सर्वसामान्य विमानातून प्रवास करु शकले नाहीत गोटबाया राजपक्षे आणि कुटुंबीय
खरंतर सोमवारी संध्याकाळीच जवळपास ६ वाजून २५ मिनिटांनी राष्ट्रपती राजपक्षे आणि त्यांच्या कुटुंबातील १५ जणांनी दुबईला जाण्यासाठी प्रयत्न केले होते. यासाठी गोटबाया यांचे काही सहकारी १५ पासपोर्ट घेऊन एअरपोर्टवरही पोहोचले होते. यात त्यांची पत्नी Ioma Rajapaksa यांचाही पासपोर्ट होता. दुबईसाठीचं फ्लाइटचं बुकिंग देखील करण्यात आलं होतं. पण इमिग्रेशन ऑफिसरनं पुढील प्रक्रिया करण्यास नकार दिला होता. त्यामुळे फ्लाइटचं राष्ट्रपती आणि त्यांच्या कुटुंबीयांना न घेताच उड्डाण झालं होतं. यानंतर राष्ट्रपतींना देशाबाहेर जाण्यासाठी हवाई दलाचं विमान वापरण्यात आलं. 

आता नव्या माहितीनुसार गोटबाया राजपक्षे मालदिवनंतर पुढे आपल्या सिक्रेट ठिकाणी पोहोचल्यानंतरच राष्ट्रपतीपदाचा राजीनामा देणार आहेत. ते मालदिवहून दक्षिण आशियातील एका छोट्याशा देशात जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Web Title: sri lanka crisis gotabaya rajapaksa got helped from maldivian speaker mohamed nasheed all you need to know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.