Sri lanka Crisis: श्रीलंकेतील नागरिकांमध्ये अराजकता; राष्ट्रपतींच्या घराला वेढा, जाळपोळ, कर्फ्यू अन् ४५ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 09:59 AM2022-04-01T09:59:28+5:302022-04-01T10:00:39+5:30

श्रीलंकेतील एका जमावाने राष्ट्रपतींच्या घराला वेढा देत मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली.

Sri lanka Crisis: Sri Lankan citizens Siege of President's house, curfew and arrest of 45 people | Sri lanka Crisis: श्रीलंकेतील नागरिकांमध्ये अराजकता; राष्ट्रपतींच्या घराला वेढा, जाळपोळ, कर्फ्यू अन् ४५ जणांना अटक

Sri lanka Crisis: श्रीलंकेतील नागरिकांमध्ये अराजकता; राष्ट्रपतींच्या घराला वेढा, जाळपोळ, कर्फ्यू अन् ४५ जणांना अटक

Next

भारताचा शेजारी देश असलेल्या श्रीलंकेत अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. श्रीलंकेच्या करन्सीची व्हॅल्यू ही डॉलरच्या तुलनेत आता जवळपास अर्धी झाली आहे. ज्यामुळे जीवनावश्यक वस्तुंचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये अराजकता पसरली असून लोक रस्त्यावर निदर्शनांसाठी उतरले आहेत. 

श्रीलंकेतील एका जमावाने राष्ट्रपतींच्या घराला वेढा देत मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. काही ठिकाणी जाळपोळही करण्यात आली. त्यानंतर श्रीलंकेच्या प्रशासनाने कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या प्रकरणी ४५ जणांना पोलिसांनी अटक देखील केली आहे. गेल्या चार दशकांमधील देशातील सर्वात वाईट आर्थिक संकट हाताळत असल्याचं एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितलं. 

सरकारी आकडेवारीनुसार, श्रीलंकेच महागाईचा दर १७ टक्क्यांहून पुढे गेला आहे. यामुळेच श्रीलंकसमोर आता गंभीर संकट निर्माण झालं आहे. एक कप चहासाठी १०० रुपये द्यावे लागत आहेत. तर ब्रेड, दूध यासारख्या पदार्थांसाठी देखील मोठी किंमत चुकवावी लागत आहे. ब्रेडचं एक पॅकेट १५० रुपयांना तर एक किलो दूध पावडर १९७५, एलपीजी सिलिंडर ४११९, पेट्रोल २५४ तर डिझेल १७६ रुपये प्रति लीटर आहे. श्रीलंका सध्या खूप मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. जीवनावश्यक सर्वच सामान हे अत्यंत महाग झालं आहे. जर या किमती अशाच राहिल्या तर उद्या कुटुंबाला काय खायला घालणार याची आता लोकांना खूप भीती वाटू लागली आहे.

गॅसचा तुटवडा असल्याने ब्रेडच्या किमती दुप्पट- 

जीवनावश्यक वस्तू, औषधं आणि इंधनासहित अनेक गोष्टी श्रीलंका परदेशातून आयात करू शकत नाही. श्रीलंकेत घरगुती गॅस सिलिंडरचा देखील मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.क ज्यामुळे एक हजार बेकऱ्या या बंद पडल्य़ा आहेत. आठवडाभरपूर्वी इंडस्ट्री असोसिएशनने याबाबत माहिती दिली होती. देशामध्ये इंधनाची कमतरता असल्याने काही ठिकाणी विजेवर चालणारी यंत्रणा बंद करावी लागली आहे. दिवसभरात तब्बल सात तास वीजपुरवठा हा खंडीत केला जातो. एन. के सीलोन बेकरी ओनर्स असोशिएशनचे अध्यक्ष जयवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही शहरी भागांमध्ये गॅसचा तुटवडा असल्याने ब्रेडच्या किमती दुप्पट झाल्या आहे. 

सर्वसामान्यांवर गंभीर परिणाम- 

ब्रेडसाठी जवळपास १५० श्रीलंकाई रुपये (०.७५ डॉलर) मोजावे लागत आहे. जर एक आठवडा अशीच परिस्थिती राहिली तर ९० टक्के बेकऱ्या बंद कराव्या लागतील. सरकारने तातडीने यावर काहीतरी उपाय काढला पाहिजे. गॅसच्या तुटवड्याचा परिणाम हा अनेक छोट्या रेस्टॉरंट्सवर होत आहे. पण सर्वसामान्य माणसांवर देखील गंभीर परिणाम होत  आहे. श्रीलंकेतील या भीषण परिस्थितीचा फटका हा फक्त गरिबांनाच बसत नाही. तर चांगलं उत्पन्न असणाऱ्या नोकरदारवर्गाला देखील बसत आहे. आपल्या गरजा पूर्ण करणं देखील अत्यंत अवघड झालं आहे. भाज्याच्या किंमती देखील गगनाला भिडल्या आहे. त्यामुळे सर्वसामान्या भाज्या देखील खरेदी करू शकत नाहीत. 

Web Title: Sri lanka Crisis: Sri Lankan citizens Siege of President's house, curfew and arrest of 45 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.