Sri Lanka Crisis: अखेर श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी दिला राजीनामा; सिंगापूरवरुन केला मेल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 09:31 PM2022-07-14T21:31:35+5:302022-07-14T21:32:47+5:30
Gotabaya Rajapaksa Resigns: श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते सध्या सिंगापूरमध्ये असून त्यांनी तिथूनच हा राजीनामा संसदेच्या अध्यक्षांना मेलद्वारे पाठवला.
Gotabaya Rajapaksa Resigns: श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते सध्या सिंगापूरमध्ये असून त्यांनी तिथून हा राजीनामा संसदेच्या अध्यक्षांना मेलद्वारे पाठवला. 13 जुलै रोजी ते राजीनामा देणार होते पण काल ते मलेशियाला पळून गेले, यानंतर देशात आणीबाणी लागू करण्यात आली.
Gotabaya Rajapaksa steps down as Sri Lanka's President
— ANI Digital (@ani_digital) July 14, 2022
Read @ANI Story | https://t.co/7T5vS55Byk#GotabayaRajapaksha#GotaResign#GotaGoGamapic.twitter.com/PRp30ScfSJ
आर्थिक संकट आणि निषेधाच्या पार्श्वभूमीवर गोटाबाया राजपक्षे यांनी बुधवारी श्रीलंकेतून पलायन केले होते. ते आधी मालदीवला आणि त्यानंतर गुरुवारी सिंगापूरला पोहोचले. सिंगापूरला पोहोचताच गोटाबाया राजपक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजपक्षे यांच्या राजीनाम्याबाबत श्रीलंकेच्या संसदीय कार्यालयाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. कार्यालय अध्यक्षांनी गोटाबाया राजपक्षे यांचा राजीनामा मिळाल्याची माहिती दिली.
#WATCH Colombo | People celebrate at Galle Face Park following the resignation of Sri Lankan President Gotabaya Rajapaksa pic.twitter.com/cfWNYrpIdJ
— ANI (@ANI) July 14, 2022
20 जुलै रोजी नवीन अध्यक्षपदासाठी निवडणूक
मीडिया रिपोर्टनुसार, गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची माहिती मिळताच आंदोलक सचिवालयाबाहेर जल्लोष करत आहेत. दरम्यान, आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी 20 जुलै रोजी देशाच्या नव्या राष्ट्राध्यक्षाची निवडणूक घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. शुक्रवारी श्रीलंकेत नव्या पंतप्रधानाची घोषणाही होणार आहे.