भाऊ सेनेत नोकरीला तरी घराचा खर्च भागत नाही, पैशांसाठी बहिणीला करावं लागतंय देहविक्रीचं काम...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 05:22 PM2022-06-04T17:22:51+5:302022-06-04T17:23:44+5:30
Sri Lanka Economic Crisis: रिपोर्ट्सनुसार, श्रीलंकेत सेक्स वर्कचं काम प्रोफेशनल वेश्या करत होत्या. पण सध्या यात नवीन तरूणी जास्त येत आहेत. श्रीलंकेत प्रॉस्टिट्यूशनवर कायदेशीरपणे बंदी आहे.
Sri Lanka Economic Crisis: शेजारी देश श्रीलंकेत मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आहे. खाण्या-पिण्याच्या वस्तूही लोकांना मिळत नाहीयेत. अशात महागाई आकाशाला भिडली आहे. त्यामुळे श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात तरूणींना सेक्स वर्कर बनावं लागत आहे. दैनिक भास्करमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, गेल्या काही महिन्यांपासून सेक्समध्ये सहभागी होणाऱ्या तरूणींची संख्या वाढत आहे. यातील जास्त तरूणी अशा आहेत ज्या त्यांची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने हे काम करत आहेत.
रिपोर्ट्सनुसार, श्रीलंकेत सेक्स वर्कचं काम प्रोफेशनल वेश्या करत होत्या. पण सध्या यात नवीन तरूणी जास्त येत आहेत. श्रीलंकेत प्रॉस्टिट्यूशनवर कायदेशीरपणे बंदी आहे. श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये प्रॉस्टिट्यूशनसाठी कोणतं ठिकाणही नाही. रिपोर्टमधून समोर आलं की, तिथे स्पा आणि मसाज सेंटर्समध्ये ही कामं सुरू आहे. याच मसाज सेंटरमधून नवीन तरूणी हे काम करत आहेत.
श्रीलंकेत आलेल्या आर्थिक संकटामुळे तरूणी प्रॉस्टिट्यूशनचं काम करत आहेत. यातील काही तरूणी आधी नोकरी करत होत्या तर काही तरूणी उच्च शिक्षणाचं स्वप्न बघत होत्या. प्रॉस्टिट्यूशनचं काम करणाऱ्या 21 वर्षीय इशाने सांगितलं की, तिला एक यशस्वी महिला व्हायचं होतं. तिचे वडील आजारी आहेत आणि आई नाहीये. तर भाऊ श्रीलंकन सेनेत नोकरी करतो. देशात सुरू असलेल्या आर्थिक संकटामुळे भावाच्या कमाईतून घर चालू शकत नव्हतं.
अशात इच्छा नसतानाही ईशाने स्पामध्ये नोकरी केली. आधी ती एका कंपनी 25 हजार रूपये पगाराने नोकरी करत होती. पण कोरोनानंतर बिघडलेल्या आर्थिक स्थितीमुळे तिची नोकरी गेली आणि ती स्पामध्ये काम करू लागली. त्यानंतर ती प्रॉस्टिट्यूशनचं काम करू लागली. ती म्हणाली की, जर तिच्या घरची स्थिती चांगली असती तर तिने कधीच हे काम केलं नसतं.
रिपोर्ट्नुसार, ईशासारख्या 40 हजार तरूणी प्रॉस्टिट्यूशनचं काम करत आहेत. यातील अर्ध्यापेक्ष जास्त राजधानी कोलंबोमध्ये आहेत. कोलंबोमध्ये हे स्पा सेंटर 24 तास सुरू असतात. अशाच एका स्पा सेंटरच्या मॅनेजरने सांगितलं की, अलिकडे काम मागणाऱ्या तरूणींची संख्या वाढली आहे. त्याने सांगितलं की, यातील जास्तीत जास्त आधी नोकरी करून घर चालवत होत्या. पण नोकरी गेल्याने त्या चिंतेत आहेत.