श्रीलंकादेखील पाकिस्तानच्या मार्गावर! पाकमध्ये गॅस सिलिंडर १०००० रुपये, पगारासाठी कंपन्यांकडे पैसे नाहीत...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 08:42 AM2023-01-05T08:42:34+5:302023-01-05T08:42:50+5:30
पाकिस्तानमध्ये खायला अन्न नाहीय, औषधे नाहीत. बाजारच्या बाजार बंद करावे लागत आहेत. लग्नाचे हॉल बंद ठेवावे लागत आहेत.
भारताच्या शेजारी देशांच्या अर्थव्यवस्था चौपट झाल्या आहेत. चीनची अर्थव्यवस्था देखील मंदीच्या फेऱ्यात अडकत चालली आहे. अशातच भारताच्या विरोधात जाऊन चीनच्या नादी लागलेल्या पाकिस्तान आणि श्रीलंकेची अर्थव्यवस्था आता अखेरच्या घटका मोजू लागली आहे.
पाकिस्तानमध्ये खायला अन्न नाहीय, औषधे नाहीत. बाजारच्या बाजार बंद करावे लागत आहेत. लग्नाचे हॉल बंद ठेवावे लागत आहेत. या देशात तर एलपीजी गॅस प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून आणावी लागत आहे. श्रीलंकेवर अजून तशी वेळ आलेली नसली तरी हा देश देखील पाकिस्तानच्यात वाटेवर गेल्याने हातच बेकार झाली आहे.
त्यातलेत्यात श्रीलंकेला भारत मदत तरी करत आहे. श्रीलंका चीनच्या कर्जामध्ये बरबाद झाला आहे. मार्च 2022 पर्यंत पाकिस्तानचे एकूण कर्ज 43 लाख करोड़ पाकिस्तानी रुपये झाले होते. इम्रान खानच्या काळात कर्ज वाढले होते. त्यांनी तीन वर्षांत जनतेवर जवळपास दररोज १४०० कोटी रुपयांचे कर्ज वाढविले.
पाकिस्तानाच्या परकीय चलनाचा साठा गेल्या महिन्यात $294 दशलक्षने कमी होऊन $5.8 अब्ज झाला आहे. श्रीलंकेत परकीय चलनाचा सतत कमी होत असलेला साठा इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचे कारण बनला आहे. पाकिस्तानात गॅस सिलिंडर आता १०००० रुपयांना मिळत आहे. आता 'वर्क फ्रॉम होम पॉलिसी' राबवून सरकारी कार्यालयातील विजेचा वापर कमी केला जात आहे. इलेक्ट्रिक पंख्यांचे उत्पादन जुलै 2023 पर्यंत थांबवण्यात येणार आहे, तर बल्बचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजे काही दिवसांनी याची देखील किल्लत होणार आहे.
संरक्षण मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, बाजार रात्री 8.30 वाजता बंद होतील, तर विवाह हॉल रात्री 10 वाजता बंद होतील. यामुळे 62 अब्ज रुपयांची बचत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.