उपद्रव करणाऱ्यांना रोखण्यासाठी, जे आवश्यक वाटेल ते करा; श्रीलंकन पंतप्रधानांचा लष्कराला आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 06:39 PM2022-07-13T18:39:00+5:302022-07-13T18:40:03+5:30
श्रीलंकेमध्ये कालपासून पुन्हा सरकारविरोधात निदर्शने सुरू झाली आहेत. यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या बातम्या आहेत.
श्रीलंकेमध्ये सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी, आता मोठ्या प्रमाणावर उपद्रव सुरूवात केला आहे. यामुळे होत असलेले नुकसान पाहता, काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून जबाबदारी पार पाडत असलेले पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे जबरदस्त संतापले आहेत. देशात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यकता वाटेल त्या पद्धतीने उपद्रव करणाऱ्यांना रोखा, असे आदेश विक्रमसिंघे यांनी लष्कर आणि पोलिसांना दिले आहेत.
श्रीलंकेमध्ये कालपासून पुन्हा सरकारविरोधात निदर्शने सुरू झाली आहेत. यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या बातम्या आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे, आंदोलक पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या शासकीय निवासस्थानाचे गेट तोडून आत शिरले आहेत.
रानिल विक्रमसिंघे आपल्या टेलीव्हिजनवरील भाषणादरम्यान म्हणाले, लोकशाहीवर घोंगावणारा हा फॅसिस्ट धोका आपल्याला नष्ट करायलाहवा. आम्ही सरकारी मालमत्तेचे नुकसान होऊ देणार नाही. राष्ट्रपती कार्यालय, राष्ट्रपती सचिवालय आणि पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानात योग्य प्रकारची सुरक्षा व्यवस्था बहाल व्हायला होवी.
तसेच, "माझ्या कार्यालयातील लोक, मला काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून काम करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही त्यांना आमचे संविधान नष्ट करू देऊ शकत नाही. काही मुख्य प्रवाहातील राजकारणीही या उपद्रवी लोकांना पाठिंबा देताना दिसतात. म्हणूनच मी देशव्यापी आणीबाणी आणि कर्फ्यू जाहीर केला आहे, असेही विक्रमसिंघे यांनी म्हटले आहे.
फॅसिस्ट शक्तींपासून धोका -
रानिल विक्रमसिंघे म्हटले, हे आंदोलक मला आपल्या कार्यवाहक राष्ट्रपती पदाच्या कर्तव्यापासून वंचित ठेवू इच्छित आहेत. पण मी अशा फॅसिस्ट आंदोलकांना कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ देऊ शकत नाही. कुठल्याही परिस्थितीत हे थांबवायला हवे. याच बोरबर, रनिल विक्रमसिंघे म्हणाले, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी, आवश्यक ती सर्व प्रकारची पावले उचलण्याचे आदेश आपण लष्करी कमांडर्स आणि पोलीस प्रमुखांना दिले आहेत. आम्ही संविधान नष्ट होऊ देऊ शकत नाही. आपली लोकशाही आबाधित राखण्यासाठी हा फॅसिस्ट धोका कोणत्याही परिस्थितीत रोखावा लागेल. कारण फॅसिझम हा आपल्यासाठी धोका आहे, असेही विक्रम सिंघे यांनी म्हटले आहे.