श्रीलंकेचे नियोजित पंतप्रधान विक्रमसिंघे
By admin | Published: August 18, 2015 10:28 PM2015-08-18T22:28:50+5:302015-08-18T22:28:50+5:30
श्रीलंकेचे नवे पंतप्रधान म्हणून रानिल विक्रमसिंघे (६६) लवकरच शपथ घेतील. विक्रमसिंघे यांच्या युनायटेड नॅशनल पार्टीला (युएनपी) सोमवारी झालेल्या
कोलंबो : श्रीलंकेचे नवे पंतप्रधान म्हणून रानिल विक्रमसिंघे (६६) लवकरच शपथ घेतील. विक्रमसिंघे यांच्या युनायटेड नॅशनल पार्टीला (युएनपी) सोमवारी झालेल्या निवडणुकीत साधे बहुमत मिळाले असून त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी महिंदा राजपक्षे यांनी आपला पराभव झाल्याचे मान्य केले आहे.
विक्रमसिंघे यांनी लोकांनी दिलेला कौल हा चांगल्या प्रशासनासाठी आहे व ८ जानेवारी रोजी झालेल्या परिवर्तनाला लोकांनी पाठिंबा दिला, असे म्हटले. २२५ सदस्यांच्या संसदेसाठीच्या निवडणुकीचे संपूर्ण निकाल जाहीर झालेले नाहीत.
युएनपीने ९३ जागा जिंकल्या असून युपीएफएने ८३ जागा व जनथा विमुक्ती पेरामुनाने ४ जागा जिंकल्या. स्पष्ट बहुमतासाठी ११३ जागांची गरज आहे. विक्रमसिंघे यांच्या पक्षाला ४ सदस्यांचीच साध्या बहुमतासाठी गरज आहे. १९६ सदस्यांची निवड ५ वर्षांसाठी झाली आहे. (वृत्तसंस्था)