श्रीलंकेत सरकारविरोधात निदर्शने सुरूच; 54 जणांना अटक, 600 वकील त्यांच्या सुटकेसाठी पोहोचले कोर्टात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 11:40 AM2022-04-05T11:40:00+5:302022-04-05T11:40:33+5:30

srilanka economic crisis : लोकांमध्ये आता आणीबाणी (Sri Lanka Emergency) आणि कर्फ्यूची (Sri Lanka Curfew) भीती दिसून येत नाही.

srilanka economic crisis people protest against gotabaya rajapaksa government 54 arrested | श्रीलंकेत सरकारविरोधात निदर्शने सुरूच; 54 जणांना अटक, 600 वकील त्यांच्या सुटकेसाठी पोहोचले कोर्टात

श्रीलंकेत सरकारविरोधात निदर्शने सुरूच; 54 जणांना अटक, 600 वकील त्यांच्या सुटकेसाठी पोहोचले कोर्टात

Next

कोलंबो : श्रीलंकेतील सध्याची परिस्थिती (Sri Lanka Crisis)अतिशय तणावपूर्ण आहे. देश आर्थिक, राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या पूर्णपणे अस्थिर झाला आहे. पुढे काय होणार हे कोणालाच माहीत नाही. अशा परिस्थितीत जनता संतापाने रस्त्यावर आली आहे. लोकांमध्ये आता आणीबाणी (Sri Lanka Emergency) आणि कर्फ्यूची (Sri Lanka Curfew) भीती दिसून येत नाही.

आंदोलन करणाऱ्या ५४ लोकांना सोडविण्या साठी ६०० वकील कोर्टात पोहोचले. अशा परिस्थितीत कोर्टाने ४८ लोकांना जेलमधून सुटका करण्याचे आदेश दिले. राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी विरोधकांना या परिस्थितीला सामोरे जाण्याचे आवाहन केले आहे. मात्र, विरोधकांनी आंदोलन थांबवण्यासाठी नकार दिला आहे.

श्रीलंकेतील लोक एका आठवड्याहून अधिक काळापासून सरकारविरोधात सातत्याने निदर्शने करत आहेत. सोमवारी झालेल्या आंदोलनादरम्यान दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आली. या हिंसाचारात ५ पत्रकार आणि अनेक आंदोलक जखमी झाले आहेत. येथून पोलिसांनी 54 आंदोलकांना अटक केली. मात्र, कोर्टाच्या आदेशानंतर ४८ जणांची सुटका करण्यात आली.

आपत्कालीन आरोग्य स्थिती घोषित
मंगळवारी देशात आपत्कालीन आरोग्य स्थिती घोषित करण्यात आली आहे. रुग्णांच्या जीविताच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याआधीही फेब्रुवारी महिन्यात सरकारने सार्वजनिक आरोग्य सेवा अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित केली होती. औषधांसोबतच श्रीलंकेतील नागरिक विजेसारख्या सुविधांसाठीही झगडत आहेत.

चार मंत्र्यांची नियुक्ती 
श्रीलंकेच्या विरोधकांनी राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांचे सरकारमध्ये सामील होण्याचे आमंत्रण नाकारले आणि देशातील अन्न, इंधन आणि औषधांच्या वाढत्या टंचाईवर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यानंतर पूर्ण मंत्रिमंडळाची नियुक्ती होईपर्यंत राष्ट्रपती राजपक्षे संसदेची वैधता आणि स्थिरता राखण्यासाठी चार मंत्र्यांची नियुक्ती केली आहे.

सोशल मीडियावरील बंदीमुळे तरुणांमध्ये संताप
सरकारने सोशल मीडियावर बंदी घातली असून, त्यामुळे तरुणांमध्ये संताप वाढत आहे. सरकार जितके कठोर होत आहे, तितकाच लोकांचा रोष वाढत आहे. #GoHomeGota हॅशटॅग ट्रेंड करत आहे. सोशल मीडियावर बंदी असतानाही लोक वेगवेगळ्या प्रकारे ऑनलाइन येत आहेत आणि चर्चा करत आहेत.

Web Title: srilanka economic crisis people protest against gotabaya rajapaksa government 54 arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.