श्रीलंका संकटात! राष्ट्राध्यक्ष राजपक्षे स्वत:च्याच भावाला पंतप्रधान पदावरून हटवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 04:44 PM2022-04-29T16:44:44+5:302022-04-29T16:46:01+5:30

Gotabaya Rajapaksa And Mahinda Rajapaksa : देशात सातत्याने सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहेत. आंदोलनकर्ते राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. 

srilankan crisis president agrees to remove brother as prime minister | श्रीलंका संकटात! राष्ट्राध्यक्ष राजपक्षे स्वत:च्याच भावाला पंतप्रधान पदावरून हटवणार

श्रीलंका संकटात! राष्ट्राध्यक्ष राजपक्षे स्वत:च्याच भावाला पंतप्रधान पदावरून हटवणार

Next

श्रीलंका मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) यांनी आपले भाऊ महिंदा राजपक्षे (Mahinda Rajapaksa) यांना पंतप्रधानपदावरून हटवण्यास सहमती दर्शवली आहे. श्रीलंका सध्या सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान देशात सातत्याने सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहेत. आंदोलनकर्ते राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. 

श्रीलंकेत महागाईचा आगडोंब उसळला आहे. लोक अन्नधान्यासाठी रस्त्यावर उतरले आहे. 2019 मध्ये निवडणुकीआधी श्रीलंकेतील सत्ताधारी पक्ष एसएलपीपीने दोन मोठी आश्वासनं दिली होती. यामध्ये पहिलं टॅक्समध्ये कपात करणं आणि दुसरं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय. सरकार स्थापन झाल्यानंतर ही आश्वासन पूर्ण करण्यासाठी पावलं उचलण्यात आली आहेत. आपल्या चुकीच्या निर्णयांमुळे देश मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाचा सामना करत आहे, याची कबुली श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी दिली होती. 

गोटाबाया यांनी सर्वकाही ठीक करण्याचं आश्वासनही दिलं. ठगेल्या अडीच वर्षांमध्ये आम्हाला अनेक मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला. कोरोना महासाथीसोबतच कर्जाचं ओझं आणि आमच्या काही चुका… त्यांना आता सुधारण्याची गरज आहे. त्या सुधारून आपल्याला पुढे जावं लागेल. लोकांचा विश्वास पुन्हा मिळवावा लागेल" असं राजपक्षे म्हणाले होते.

कर्जाचा बोजा वाढल्यानंतर आपण त्वरित आयएमएफकडे संपर्क साधायला हवा होता. यासोबतच देशात केमिकल फर्टिलायझरवर निर्बंधही घालायला नको होते, असं त्यांनी सांगितलं होतं. श्रीलंकन सरकारनं देशात कृषी क्षेत्र पूर्णपणे ऑर्गेनिक करण्यासाठी केमिकल फर्टिलायझरच्या वापरावर निर्बंध घातले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: srilankan crisis president agrees to remove brother as prime minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.