बांगलादेशच्या सैन्यात इस्लामीकरणाला सुरवात, आता महिला सैनिक हिजाबमध्ये युद्ध लढताना दिसणार! 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 03:55 PM2024-09-26T15:55:13+5:302024-09-26T15:56:14+5:30

बांगलादेशातील शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर, तेथील सरकारच नव्हे तर लष्करही कट्टरतावाद्यांसमोर अथवा कट्टरपंथियांसमोर नतमस्तक झाल्याचे दिसत आहे.

Start of Islamization in Bangladesh army, now women soldiers will be seen in hijab battleground | बांगलादेशच्या सैन्यात इस्लामीकरणाला सुरवात, आता महिला सैनिक हिजाबमध्ये युद्ध लढताना दिसणार! 

बांगलादेशच्या सैन्यात इस्लामीकरणाला सुरवात, आता महिला सैनिक हिजाबमध्ये युद्ध लढताना दिसणार! 

बांगलादेशातील शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर, तेथील सरकारच नव्हे तर लष्करही कट्टरतावाद्यांसमोर अथवा कट्टरपंथियांसमोर नतमस्तक झाल्याचे दिसत आहे. तेथे मोठ्या प्रमाणावर इस्लामीकरणाला सुरवा झाली आहे. आता बांगलादेशच्या सैन्यात महिला सैनिकांना हिजाब परिधान करण्याची परवानगी देण्यात आली आहे. खरे तर, 2000 साली बांगलादेशच्या सैन्यात महिलांचा समावेश करण्यात आला होता. तेव्हापासूनच सैन्यात हिजाबवर बंदी होती. मात्र आता कट्टरतावाद्यांच्या दबावामुळे बांगलादेश आर्मीने आपल्या नियमांत बदल केले आहेत.

बांगलादेशी माध्यमातील वृत्तांनुसार, जर आता महिला सैनिकांची हिजाब घालण्याची इच्छा असेल तर त्या घालू शकणार आहेत. यासंदर्भात ॲडज्युटंट जनरल कार्यालयाने आदेशही जारी केला आहे. यानंतर आता महिला लष्करी कर्मचाऱ्यांसाठी हिजाब घालणे ऐच्छिक करण्यात आले आहे. BDNews 24 ने दिलेल्या वृत्तानुसार, बांगलादेशात महिला अधिकारी, नर्सिंग कर्मचारी आणि इतर लष्करी कर्मचाऱ्यांना हिजाब घालण्यावरील बंदी आता हटवण्यात आली आहे. "3 सप्टेंबर रोजी झालेल्या PSO परिषदेत एक सैद्धांतिक निर्णय घेण्यात आला असून, यात इच्छुक महिला कर्मचाऱ्यांना गणवेशासह हिजाबही घालण्याची परवानगी देण्यात आली आहे," असे ॲडज्युटंट जनरलच्या कार्यालयाने जारी केलेल्या आदेशात म्हणण्यात आले आहे.

बांगलादेशच्या लष्करात 2000 साली महिलांचा समावेश करण्यात आला. या महिला सैनिकांना आतापर्यंत गणवेशासह हिजाब घालण्याची परवानगी नव्हती. ॲडज्युटंट कार्यालयाने आता वेगवेगळ्या गणवेशांसोबतच (कॉम्बॅट युनिफॉर्म, वर्किंग युनिफॉर्म आणि साडी) हिजाबचे नमुने देण्याचे निर्देश दिले आहेत. हिजाबच्या नमुन्यात फॅब्रिक, रंग आणि आकाराचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच, प्रस्तावित हिजाब परिधान केलेले महिला लष्करी जवानांचे रंगीत फोटो 26 सप्टेंबरपर्यंत संबंधित विभागाला पाठवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

Web Title: Start of Islamization in Bangladesh army, now women soldiers will be seen in hijab battleground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.