'पवित्र' हत्तीच्या मृत्यूमुळे श्रीलंकेतील लोकांवर शोककळा, म्हैसूरच्या राजाने दिला होता गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 06:58 PM2022-03-09T18:58:24+5:302022-03-09T19:03:04+5:30

Sacred Elephant Death In Sri Lanka : 'द इंडिपेंडेंट' मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, या पवित्र हत्तीचं नाव 'नाडुंगमुवा राजा' होतं. त्याचं ६८ व्या वर्षी कोलंबोजवळ निधन झालं.

State funeral performed after the death of the sacred elephant in Sri Lanka | 'पवित्र' हत्तीच्या मृत्यूमुळे श्रीलंकेतील लोकांवर शोककळा, म्हैसूरच्या राजाने दिला होता गिफ्ट

'पवित्र' हत्तीच्या मृत्यूमुळे श्रीलंकेतील लोकांवर शोककळा, म्हैसूरच्या राजाने दिला होता गिफ्ट

googlenewsNext

(Image Credit : The Hindu)

प्राणी आणि मनुष्यांचं नातं फार जुनं आहे. मनुष्य खूप आधीपासून प्राणी पाळतात. कधी कधी त्यांच्यात असं नातं तयार होतं की, ते आपसात भावनात्मक रूपाने जुळतात. अशीच एक घटना श्रीलंकेतून (Sri Lanka) समोर आली आहे. या देशातील सर्वात पवित्र हत्तीचा मृत्यू (sacred elephant death) झाल्यानंतर त्याचा राजकीय अंत्यसंस्कार करण्यात आला. इतकंच नाही तर हत्तीचे अवशेष संरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

'द इंडिपेंडेंट' मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, या पवित्र हत्तीचं नाव 'नाडुंगमुवा राजा' होतं. त्याचं ६८ व्या वर्षी कोलंबोजवळ निधन झालं. या हत्तीला आशियातील सर्वात मोठा पाळिव हत्ती मानलं जात होतं आणि त्याची उंची १०.५ फूट होती. या हत्तीने बौद्ध धार्मिक कार्यक्रमांममध्य महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. हा हत्ती सर्वात प्रसिद्ध हत्तींपैकी एक होता.

(Image Credit : theguardian.com)

भारताने दिला होता गिफ्ट

या हत्तीचा जनम १९५३ मध्ये भारतात झाला होता आणि तत्कालीन म्हैसूरच्या राजाने श्रीलंकेतील बौद्ध भीक्षूला भेट म्हणून दिला होता. या हत्तीचा समावेश कॅंडी शहरात दरवर्षी होणाऱ्या महत्वपूर्ण धार्मिक कार्यक्रम 'एसाला पेराहेरा पेजेंट' मध्ये केला जात होता. हत्तीच्या पाठीवर भगवान गौतम बुद्ध यांचा पवित्र दात ठेवला जात होता. 

हा हत्ती फायर ईटर्स आणि ढोल ताशांच्या मधोमध चालत होता. त्याची खास सुरक्षा व्यवस्थाही होती. राजाने या पवित्र कार्यक्रमात ११ वर्ष भाग घेतला. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोतबया राजपक्षे यांनी ट्विट करत लिहिलं की, 'हत्तींचा राजा, जो अनेक वर्षापासून देश आणि विदेशातील लोकांसाठी पूज्यनीय आहे. मी प्रार्थना करतो की, त्याच्या आत्म्यास शांती मिळो'.

(Image Credit : independent.co.uk)

राजपक्षे यांच्या कार्यालयाने सांगितलं की, भविष्यातील पिढ्यांसाठी या पवित्र हत्तीचं शरीर सरंक्षित केलं जाईल आणि याला राष्ट्रीय संपत्ती घोषित केलं जाईल. अंत्यसंस्कारानंतर हत्तीचं शरीर तज्ज्ञांकडे सोपवलं जाईल. स्थानिक परंपरेनुसार, केवळ विशेष शारीरिक लक्षणं असलेल्या हत्तींनाच या भूमिकेसाठी निवडलं जात होतं. यासाठी हत्ती सपाट पाठीचे आणि विशेष रूपाने घुमावदार दातांचे हवे होते. 
 

Web Title: State funeral performed after the death of the sacred elephant in Sri Lanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.