मेंदूच्या कर्करोगाचा बीमोड करणा-या स्टेमसेल

By admin | Published: October 27, 2014 01:53 AM2014-10-27T01:53:05+5:302014-10-27T01:53:05+5:30

मूळ भारतीय असणाऱ्या अमेरिकन संशोधकाच्या नेतृत्वाखाली हॉवर्डच्या संशोधक पथकाने मेंदूच्या कर्करोगात शरीरात तयार होणारे विषारी घटक नष्ट करणाऱ्या स्टेमसेल वा मुख्य पेशींचा शोध लावला आहे

Stemcell removing brain cancer | मेंदूच्या कर्करोगाचा बीमोड करणा-या स्टेमसेल

मेंदूच्या कर्करोगाचा बीमोड करणा-या स्टेमसेल

Next

ह्यूस्टन- मूळ भारतीय असणाऱ्या अमेरिकन संशोधकाच्या नेतृत्वाखाली हॉवर्डच्या संशोधक पथकाने मेंदूच्या कर्करोगात शरीरात तयार होणारे विषारी घटक नष्ट करणाऱ्या स्टेमसेल वा मुख्य पेशींचा शोध लावला आहे. या स्टेमसेलच्या सहाय्याने मेंदूचा कर्करोग बरा करण्याची अभिनव पद्धत या पथकाने शोधून काढली आहे. मॅसच्युसेट्स येथील हॉवर्ड स्टेम सेल संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. खालिद शाह यांनी उंदरावर प्रयोग करुन जेनेटिक पद्धतीने तयार केलेल्या स्टेम सेलवर कर्करोगाच्ो विषारी घटक सोडले. या स्टेमसेलनी ट्यूमरचे विषारी घटक नष्ट केले. या विषाचे कोणतेही परिणाम सेलवर झाले नाहीत हे विशेष ! डॉ. खालिद शाह हे मूळ काश्मीरचे आहेत.

.

Web Title: Stemcell removing brain cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.