वडिलांसोबत पटत नव्हतं, आई धुणी-भांडी करुन घर चालवायची, स्टीव्ह जॉब्स यांच्या मुलीचा खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 01:16 PM2018-08-06T13:16:44+5:302018-08-06T13:50:14+5:30

स्टीव्ह जॉब्स हे टेक्नॉलॉजी क्षेत्रातील असं नावं आहे जे जगभरात प्रसिद्ध आहे. अॅपल प्रॉडक्ट यशस्वी करण्यात स्टीव जॉब्स यांचे विचार आणि रचनात्कतेचं मोठं योगदान होतं.

Steve Jobs daughter Lisa Brennan-Jobs shocking statement about her father | वडिलांसोबत पटत नव्हतं, आई धुणी-भांडी करुन घर चालवायची, स्टीव्ह जॉब्स यांच्या मुलीचा खुलासा!

वडिलांसोबत पटत नव्हतं, आई धुणी-भांडी करुन घर चालवायची, स्टीव्ह जॉब्स यांच्या मुलीचा खुलासा!

Next

स्टीव्ह जॉब्स हे टेक्नॉलॉजी क्षेत्रातील असं नावं आहे जे जगभरात प्रसिद्ध आहे. अॅपल प्रॉडक्ट यशस्वी करण्यात स्टीव जॉब्स यांचे विचार आणि रचनात्कतेचं मोठं योगदान होतं. अॅपल आज जगातली सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली कंपनी आहे. आज युवकांसाठी स्टीव्ह जॉब्स हे प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांनी स्वत:च्या मेहनतीने इतकं मोठं यश मिळवलं. आज ते नसले तरी त्यांच्या विचारांना जगभरातील लोक आदर्श मानतात, पण स्टीव जॉब्स यांच्याबद्दल त्यांच्या मुलीने थक्क करणारे काही खुलासे केले आहेत.  

(Image Credit : vanityfair)

लीसा ब्रेनन-जॉब्सने आपल्या 'स्माल फ्राय' या पुस्तकात वडील स्टीव्ह जॉब्स आणि तिच्या नात्याबाबत काही गोष्टी लिहिल्या आहेत. तिने वेनिटी फेअर मॅगझिनमध्ये लिहिलेल्या एका लेखात या पुस्तकातील काही भाग प्रकाशित केला आहे.  

(Image Credit : freepressjournal)

या पुस्तकात तिने एक मुलगी आणि वडील यांच्या नात्यातील कठिण गोष्टी लिहिल्या आहेत. लीसाने या पुस्तकात लिहिले आहे की, स्टीव्ह जॉब्स म्हणजेच तिच्या वडिलांनी तिला आपली मुलगी मानण्यास नकार दिला होता. अनेक वर्ष त्यांनी लीसाला मुलगी म्हणून स्विकारलं नव्हतं. आणि जेव्हा त्यांनी तिचा मुलगी म्हणून स्विकार केला तेव्हाही वडील आणि मुलीत एक अंतर होतं. 

(Image Credit : vanityfair) (लीसा स्टीव्ह जॉब्स आणि आई क्रिसनसोबत)

काय झालं होतं?

1978 मध्ये लीसा ब्रेननचा जन्म झाला तेव्हा तिची आई क्रिशन ब्रेनन आणि स्टीव जॉब्स हे २३ वर्षांचे होते. क्रिसनने एका मित्राच्या फार्महाऊसवर लीसाला जन्म दिला होता. क्रिसन आणि स्टीव एकमेकांना जवळपास ५ वर्ष डेट करत होते. पण क्रिसनने मुलीला जन्म दिल्यावर स्टीव्ह  तिच्यापासून दूर राहू लागले होते. स्टीव्ह जॉब्स लीसाच्या जन्मानंतर काही दिवसांनी तिला बघायलाही आले होते. पण ते सर्वांना हेच सांगत होते की, ही माझी मुलगी नाही. 

(Image Credit: vanityfair)

लीसानुसार, स्टीव्ह जॉब्स यांनी तिच्या आईला कोणतीही आर्थिक मदत केली नाही. त्यामुळे घरखर्च चालवण्यासाठी तिच्या आईला दुसऱ्यांच्या घरी भांडी घासण्याचं काम करावं लागलं होतं. तर स्टीव्ह जॉब्स यांनी लीसाला आपलं मानण्यास नकार दिला होता. लीसा ९ वर्षांची होईपर्यंत स्टीव्ह हाच दावा करत होते की, ते इन्फर्टाइल आहेत आणि ते वडील होऊ शकत नाहीत. 

लीसा सांगते -

“मी दोन वर्षांची होईपर्यंत माझी आई सोशल बेनिफिट्स घेण्यासोबतच दुसऱ्यांच्या घरी भांडी घासत, इतर कामं करत घर चालवत होती. माझ्या वडिलांनी तिला काहीच मदत केली नाही. १९८० मध्ये कॅलिफोर्निया कोर्टाने माझ्या वडिलांना आम्हाला दर महिन्याचा खर्च देण्याचे आदेश दिले. तेव्हा त्यांनी खोटे पुरावे सादर करत मी बाळ जन्माला घालू शकत नाही, असे सांगितले. आणि दुसऱ्या व्यक्तीचं नाव सांगत तो माझा वडील असल्याचं सांगितलं".

त्यानंतर कोर्टाने डीएनए टेस्ट करण्याचे आदेश दिले आणि त्यातून हे स्पष्ट झालं की, माझे वडील स्टीव्ह जॉब्स हेच आहे. त्यानंतर कोर्टाने त्यांना आम्हाला ५०० डॉलर दर महिना भत्ता आणि इतरही खर्च उचण्याचे आदेश दिले. 

त्यानंतर स्टीव्ह जॉब्स यांनी लीसाचा स्विकार तर केला पण दोघांच्या नात्यात नेहमी एक दरी होती. एक अनुभव लीसाने सांगितला की, जेव्हा माझ्या आईला सॅन फ्रान्सिस्कोतील कॉलेजमध्ये जायचं असायचं तेव्हा मी वडील स्टीव्ह जॉब्स यांच्या घरी थांबायची. एके दिवशी मी स्टीव जॉब्स यांना विचारलं की, जेव्हा पोर्श कार तुमच्या कोणत्याच कामाची नसेल तेव्हा ती कार मी घेऊ शकते का? यावर स्टीव यांचं उत्तर नाही असं होतं. "तूला काहीही मिळणार नाही. काहीच नाही". 

लीसाने सांगितले की, एकदा स्टीव्ह मला माझ्या शरीराचा टॉयलेटसारखा वास येतो, असे म्हणाले होते. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा स्टीव्ह जॉब्स यांच्या शेवटच्या दिवसात मी त्यांना भेटायला जात होते. पण काही काळाने आमच्यातील नातं थोडं चांगलं झालं होतं. पण बोलण्यात कधीच वडील-मुलीचं नातं नाही दिसलं. 
 

Web Title: Steve Jobs daughter Lisa Brennan-Jobs shocking statement about her father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.