स्टीव्ह जॉब्स यांनी बनवलेल्या अॅपल 1 कॉम्प्युटरचा होणार लिलाव, कोट्यवधीची बोली लागण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 02:35 PM2018-08-28T14:35:58+5:302018-08-28T14:37:04+5:30
तंत्रज्ञान क्षेत्रात जगातील आघाडीवर असलेल्या अॅपल कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी बनवलेल्या संगणकाचा लिलाव होणार आहे.
नवी दिल्ली - तंत्रज्ञान क्षेत्रात जगातील आघाडीवर असलेल्या अॅपल कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी बनवलेल्या संगणकाचा लिलाव होणार आहे. अॅपल कंपनीसाठी खास असलेला हा अॅपल 1 संगणक अजूनही बऱ्यापैकी कार्यरत असून, 25 सप्टेंबर रोजी त्याचा लिलाव होणार आहे. लिलावामध्ये या संगणकाला सुमारे 3 लाख डॉलर एवढी किंमत मिळण्याची शक्यता आहे.
1970 साली अॅपल कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स आणि स्टीव्ह वोझनिक यांनी अॅपल 1 हा संगणक तयार केला होता. या खास संगणकाचा लिलाव बोस्टन स्थित आरआर ऑक्शनकडून आजोजित करण्यात येणार आहे. अॅपल 1 हा संगणक त्या खास 60 संगणकांपैकी आहे, जे आजही अस्तित्वात आहेत. अॅपल 1 संगणकाला अॅपल I किंवा अॅपल-1 या नावानेही ओळखले जाते. हा एक डेस्कटॉप संगणक आहे. तसेच अॅपलने 1976 साली तो बाजारात आणला होता.
लिलावामध्ये केवळ मदरबोर्डच नाही तर ओरिजनल मेन्युअल, पीरियड स्टाइल मॉनिटर आणि कीबोर्ड यांचाही समावेश असेल. 1976 साली संगणक किती शक्तिशाली होता, हे यामाध्यमातून दाखवण्यात येईल. अॅपल 1 एक्स्पर्टस् कोरी कोहेन यांनी 2018 मध्ये या संगणकाला रिस्टोअर केले होते. तसेच त्यांनी त्याला 8.5/10 एवढे रेटिंग दिले होते.