स्टीव्ह जॉब्स यांच्या 'या' सँडल इतक्या कोटींना विकल्या, कारण जाणून तुम्हाला वाटेल आश्चर्य!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 06:18 PM2022-11-15T18:18:08+5:302022-11-15T18:18:47+5:30
Steve Jobs : स्टीव्ह जॉब्स 70 आणि 80 च्या दशकातील फोटोंमध्ये हे सँडल घातलेले दिसतात.
आजकाल आपण बघतो अनेक प्रसिद्ध लोकांनी वापरलेल्या वस्तूंचा लिलाव होत आहे. तसेच, अॅपलचे (Apple) संस्थापक स्टीव्ह जॉब्स (Steve Jobs) यांच्या वस्तूंचा लिलाव होत आहे. लिलावात होणाऱ्या वस्तूंची बोली खूप जास्त लावली जात आहे. पण, त्यांच्या Birkenstocks सँडलसाठी आश्चर्यकारक बोली लावण्यात आली आहे. या सँडलची खास गोष्ट म्हणजे स्टीव्ह जॉब्स यांनी ज्या गॅरेजमध्ये अॅपलची स्थापना केली, त्या गॅरेजमध्ये स्टीव्ह जॉब्स हे सँडल घालत होते.
स्टीव्ह जॉब्स यांच्या या Birkenstocks सँडलसाठी 218,700 डॉलरची (जवळपास 1.77 कोटी रुपये) बोली लावण्यात आली. तपकिरी रंगाच्या या सँडलच्या बोलीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. लिलावापूर्वी अंदाज वर्तवला जात होता की, स्टीव्ह जॉब्स यांच्या या सँडल सुमारे 80 हजार डॉलर्समध्ये खरेदी केल्या जाऊ शकतात. त्यांच्या या सँडल्स खूप लोकप्रिय होत्या. स्टीव्ह जॉब्स हे 70 आणि 80 च्या दशकातील फोटोंमध्ये हे सँडल घातलेले दिसतात.
सँडलसाठी बोली लावणाऱ्या ज्युलियनच्या लिलावानुसार स्टीव्ह जॉब्स यांनी या सँडल आपल्या घराच्या व्यवस्थापकाला दिल्या होत्या. पण, या सँडल्सची लिलावात लिस्ट कोणी केली, हे आता स्पष्ट झालेले नाही. मात्र, कंपनीने खरेदीदाराबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. Birkenstocks बद्दलच्या चर्चेवेळी स्टीव्ह जॉब्स यांची मुलगी Crisann Brennan हिने एका मुलाखतीत सांगितले की, हे सँडल स्टीव्ह जॉब्स यांच्या सिंपल साइडचा भाग होते. हे त्यांचे युनिफॉर्म होते.
दरम्यान, अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या विचारांना, त्यांच्या आयुष्याला अनेक जण फॉलो करतात. 2011 मध्ये स्टीव्ह जॉब्स यांचे निधन झाले. त्यांच्यामुळेच आयफोन हा मोबाईलमधील अग्रगण्य ब्रॅंड झाला. त्यांच्यासारखी बिझिनेस स्ट्रॅटेजी हवी म्हणून अनेक जण प्रयत्न करतात. स्टीव्ह जॉब्स इतके श्रीमंत असून अगदी साधे राहायचे. त्यांचा हाच अंदाज सर्वांना आवडायचा.
Apple-1 Prototype ची सुद्धा करोडोत लागली होती बोली
नुकतीच Apple-1 Prototype ची विक्री प्रक्रिया पूर्ण झाली. बोली लावताना त्याची किंमत करोडोंच्या घरात गेली. Apple-1 Prototype ची बोली इतकी जास्त असण्यामागे एक खास कारण आहे. त्याचा वापर स्टीव्ह जॉब्सने केला होता. रिपोर्टनुसार, Apple-1 Prototype जवळपास 677,196 डॉलरमध्ये (सुमारे 5.5 कोटी रुपये) विकला गेला आहे. या प्रोटोटाइपचा वापर स्टीव्ह जॉब्स यांनी 1976 मध्ये कॅलिफोर्नियातील माउंटन व्ह्यू येथील बाईट शॉपचे मालक पॉल टेरेल यांना कॅम्प्युटरची खासियत दाखवण्यासाठी केला होता. हे जगातील पहिल्या पर्सनल कॅम्प्युटर स्टोअरपैकी एक होते. मात्र, त्याच्या खरेदीदाराची माहिती देण्यात आली नाही.