शक्तिशाली वादळाचा फिलिपाईन्सला तडाखा

By admin | Published: December 8, 2014 01:42 AM2014-12-08T01:42:02+5:302014-12-08T01:42:02+5:30

हॉगुपीट हे शक्तिशाली वादळ फिलिपाईन्सच्या किनाऱ्याला धडकले असून, जोरदार वाऱ्यामुळे वृक्ष व विजेचे खांब कोसळले आहेत.

Stiff the powerful storm of the Philippines | शक्तिशाली वादळाचा फिलिपाईन्सला तडाखा

शक्तिशाली वादळाचा फिलिपाईन्सला तडाखा

Next

मनिला : हॉगुपीट हे शक्तिशाली वादळ फिलिपाईन्सच्या किनाऱ्याला धडकले असून, जोरदार वाऱ्यामुळे वृक्ष व विजेचे खांब कोसळले आहेत. गतवर्षी वादळाच्या तडाख्यात हजारो लोक मरण पावले होते. त्याला वर्षही होण्याच्या आत हे दुसरे नैसर्गिक संकट फिलिपाईन्सवर आदळले आहे.
१० लाख लोकांना आधीच सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे; पण ही स्थलांतर शिबिरे किती सुरक्षित आहेत हे सांगता येत नाही. संयुक्त राष्ट्राच्या मते शांततेच्या कार्यातील हे सर्वांत मोठे स्थलांतर आहे. हॉगुपीट हे वादळ पॅसिफिक समुद्रातून आले असून त्याची तीव्रता ५ पर्यंत पोहोचली होती. त्यानंतर ही तीव्रता कमी होत ३ झाली आहे. वादळ सुपरवादळापासून चक्रीवादळात बदलले आहे. सध्या वादळी वारे तुफान वेगाने फिरत असून, पाऊसही कोसळत आहे, असे कतार्इंगानचे महापौर विल्टन को यांनी रेडिओ मुलाखतीत सांगितले.
सध्या १४० केपीएच वेगाने वाहत असून सोमवारी सकाळपर्यंत ते मनिलाच्या दक्षिणेकडे जाईल असे सांगण्यात आले. फिलिपिनो भाषेत हॉगुपीट या नावाचा अर्थ तडाखा देणे असा आहे. समर व लेटे प्रांतात वीज गायब असून, या भागातील टाक्लोबान सिटी हा गतवर्षीच्या हैयान वादळाचा केंद्रबिंदू होता. (वृत्तसंस्था)
 

Web Title: Stiff the powerful storm of the Philippines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.