डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आरोप करणा-या पॉर्नस्टार स्टॉर्मी डेनियलला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 05:10 PM2018-07-12T17:10:35+5:302018-07-12T17:26:23+5:30
पॉर्नस्टार स्टॉर्मी डेनियल हिला ओहियोमधील एका स्ट्रिप क्लबमधून अटक करण्यात आली आहे. तिच्यावर एका ग्राहकाला कथितस्वरुपात स्पर्श केल्याचा आरोप आहे. याबाबतची माहिती स्टॉर्मी डेनियल हिच्या वकिलाने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
ओहिओ : पॉर्नस्टार स्टॉर्मी डेनियल हिला ओहियोमधील एका स्ट्रिप क्लबमधून अटक करण्यात आली आहे. तिच्यावर एका ग्राहकाला कथितस्वरुपात स्पर्श केल्याचा आरोप आहे. याबाबतची माहिती स्टॉर्मी डेनियल हिच्या वकिलाने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
स्टॉर्मी डेनियल हिचे वकील मायकल एवेनट्टी यांनी ट्विट केले आहे की, कोलंबस ओहिओमध्ये एका स्ट्रिप क्लबमध्ये माझी क्लायंट स्टॉर्मी डेनियनला अटक करण्यात आली आहे. स्ट्रिप क्लबमध्ये तिला एक परफॉर्म केल्याप्रकरणी अटक केली आहे. देशातील शंभरहून अधिक स्ट्रिप क्लबमध्ये तिने अशा पद्धतीचा परफॉर्म केला आहे. तिच्या अटकेमागे काहीतरी षडयंत्र असून त्यापाठिमागे राजकीय हात आहे. या चुकीच्या आरोपाविरोधात आम्ही लढणार आहेत. तिला क्लबमध्ये एका ग्राहकाला कथितस्वरुपात स्पर्श करण्याची आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
Just rcvd word that my client @StormyDaniels was arrested in Columbus Ohio whole performing the same act she has performed across the nation at nearly a hundred strip clubs. This was a setup & politically motivated. It reeks of desperation. We will fight all bogus charges. #Basta
— Michael Avenatti (@MichaelAvenatti) July 12, 2018
गेल्या काही दिवसांपूर्वी स्टॉर्मी डेनियल हिने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत कथित शारीरिक संबंध होते, असे सांगत जगभरात खळबळ उडवून दिली होती. तिने सांगितले होते की, 2006 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत कथित शारीरिक संबंध होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी यासंदर्भात कोणतीही वाच्यता न करण्यासाठी तिला 2016 मध्ये 130000 डॉलर दिले होते. मात्र, यासंबंधी स्टॉर्मी डेनियलने केलेले आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळले होते.
She was arrested for allegedly allowing a customer to touch her while on stage in a non sexual manner! Are you kidding me? They are devoting law enforcement resources to sting operations for this? There has to be higher priorities!!! #SetUp#Basta
— Michael Avenatti (@MichaelAvenatti) July 12, 2018