अजब निर्णय - सेक्स करायचंय, पोलीसांना २४ तास आधी सूचना द्या
By admin | Published: January 23, 2016 05:18 PM2016-01-23T17:18:01+5:302016-01-23T17:18:01+5:30
एखाद्या महिलेशी शरीरसंबंध ठेवायचे असतिल तर त्याची २४ तास आधी पोलीसांना कल्पना द्यावी लागेल असा आदेश कोर्टाने दिला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. २३ - नॉर्थ यॉर्कशायरमधल्या बलात्कारप्रकरणात न्यायाधीशांनी आरोपीची मुक्तता केली आहे, परंतु एखाद्या महिलेशी शरीरसंबंध ठेवायचे असतिल तर त्याची २४ तास आधी पोलीसांना कल्पना द्यावी लागेल असा आदेशही कोर्टाने दिला आहे.
न्यायाधीशांनी सदर आरोपीचे नाव जाहीर केलेले नाही. या व्यक्तिला बलात्काराच्या आरोपातून मुक्त केले असले तरी कुठलीही जोखीम नको म्हणून न्यायाधीशांनी काही बंधने घातली आहेत. मोबाईल फोनची सगळी माहिती पोलीसांकडे जाहीर करणे ही अटदेखील घालण्यात आली आहे.
त्याच्यावर बलात्कार केल्याचा आरोप होता, परंतु आरोपीने शरीरसंबंध जबरदस्तीने नाही तर संमतीने झाल्याचा दावा केला, जो कोर्टाने मान्य केला.
सध्याचा आदेश हंगामी स्वरुपाचा असून मे पर्यंत तरी या आरोपीला शरीरसंबंध ठेवण्याआधी २४ तास पोलीसांना तशी सूचना द्यावी लागणार आहे.