चीनच्या बग्गीला दिसली अजब प्रतिकृती; चंद्रावर झोपडी?, शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 07:03 AM2021-12-08T07:03:51+5:302021-12-08T07:04:12+5:30
नेटकरी म्हणतात एलियन्सने बनवले घर
चंद्रावर कोणीतरी झोपडी बांधली आहे आणि तिथे कोणी राहतंय, असं जर कोणी सांगितले तर त्याला आपण वेडं ठरवू... पण जर झोपडीच्या आकाराची प्रतिकृती तिथे पाहिली गेली असेल तर? होय हे खरे आहे. चीनची एक बग्गी (रोव्हर) सध्या चंद्रावर भ्रमण करत आहे आणि त्यावर असलेल्या कॅमेऱ्याने झोपडीसदृष्य प्रतिकृतीचा फोटो पाठवला आहे.
चीनच्या रोव्हरला त्याच्यापासून ८० मीटर दूरवर ही आकृती दिसली आहे. त्यामुळे ती काहीशी अंधुक दिसते. पण ती झोपडीसारखीच आहे.
कुठे दिसली 'झोपडी'?
चीनच्या रोव्हरला ही प्रतिकृती चंद्राच्या उत्तरेकडील क्षितिजावर आढळली आहे. हा आकृती झोपडीसारखी होती. या झोपडीजवळच एक मोठा गोलाकार खोलगट भागही आहे.
हे नेमके काय?
एलियन्सने चंद्रावर क्रॅश लँडिंग केले असेल आणि त्यांनी येथे तात्पुरते घर बनवले असावे. एलियन्सने चंद्रावर क्रॅश लँडिंग केले असेल आणि त्यांनी येथे तात्पुरते घर बनवले असावे. चंद्रावर संशोधनासाठी यापूर्वी आलेल्या अनेक यानांपैकी एखादे यान असावे. याबद्दल आता चीन जोमाने शोध घेत आहे.