विचित्र प्रकार! राक्षस बनून घाबरवत होता, पोलिसांनी केली अटक
By पूनम अपराज | Published: January 1, 2021 06:20 PM2021-01-01T18:20:48+5:302021-01-01T18:28:20+5:30
News in Pakistan : ज्यावर आतापर्यंत हजाराहून अधिक लाईक्स आणि 200 हून अधिक री-ट्वीट करण्यात आले आहेत. कमेंटमध्ये लोकांनी मजेदार प्रतिक्रिया देखील दिल्या आहे.
पाकिस्तानच्या पेशावरमध्ये एका व्यक्तीने असे काही केले जे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. तुम्ही बरेच विचित्र व्हिडिओ पाहिले असतील ज्यात लोक पेहराव करून मुखवटा घालून लोकांना घाबरवतात आणि लोकांना हसवतात. पेशावरमध्ये भुताचा पेहराव करून मुखवटा लावून एक माणूस नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला लोकांना घाबरवत होता. पोलिसांनी तातडीने त्याला अटक केली.
त्या व्यक्तीने भूताचा मुखवटा घातला आहे आणि पोलिस अधिकारी त्याच्या शेजारी उभे आहेत हे चित्रात दिसू शकते. ट्विटर यूजर ओमर कुरेशी नावाच्या व्यक्तीने हे चित्र शेअर केले आहे. एका ट्विटर यूजरने विनोदाने लिहिले की, 'त्याला पाहून कोणीही त्याच्याकडे येणार नाही. कोरोना टाळण्याचा उत्तम मार्ग. '
Police in the Pakistani city of Peshawar arrest a young man on New Year’s eve - for wearing a costume mask to scare people pic.twitter.com/sU9f1NDcAf
— omar r quraishi (@omar_quraishi) January 1, 2021
याबाबत आयएफएस अधिकारी प्रवीण कसवान यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लिहिले, 'हा मास्क कोविडपासून रक्षण करू शकतो.' हा फोटो 1 जानेवारी रोजी सकाळी शेअर केला होता. ज्यावर आतापर्यंत हजाराहून अधिक लाईक्स आणि 200 हून अधिक री-ट्वीट करण्यात आले आहेत. कमेंटमध्ये लोकांनी मजेदार प्रतिक्रिया देखील दिल्या आहे.
Full video of transformation here. pic.twitter.com/w3q6tXiBlb
— Desi Gooner (@Sahil_Adhikaari) January 1, 2021
Bechare ko mask nahi mil raha tha isliye wo pehn ke ghum raha tha. You nirdayi log. 🥺
— ashish (@NotNaadan) January 1, 2021