शहरातील गुन्हेगारीवर नजर ठेवणार भटके कुत्रे, गळ्यात लटकवले अत्याधुनिक व्हिडीओ कॅमेरे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 01:05 PM2017-09-26T13:05:48+5:302017-09-26T13:14:29+5:30
कुत्र्याने भुंकायला सुरूवात केली की जॅकेटमधला कॅमेरा आपोआप सुरू होईल आणि त्याचं रिअल टाइम रेकॉर्डिंग घरबसल्या कंम्प्यूटर किंवा मोबाइलवरून...
बॅंकॉक - रस्त्यांवर फिरणा-या भटक्या कुत्र्यांमुळे माणसांना अनेकदा नाहक त्रास सहन करावा लागतो. केवळ भारतातच भटक्या कुत्र्यांचा त्रास होतो असं नाहीये तर जगभरात भटक्या प्राण्यांमुळे त्रास होतो. याच त्रासाला थायलंडचे नागरिक अनेक वर्षांपासून वैतागले आहेत. मात्र आता या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी एक नवी शक्कल लढवली आहे.
थायलंडच्या चेल लिमिटेड नावाच्या एका अॅडव्हर्टायझिंग कंपनीने कुत्र्यांसाठी एका अत्याधुनिक जॅकेटची निर्मीती केली आहे. हे जॅकेट भटक्या कुत्र्यांना घालून त्यांना सुरक्षारक्षक किंवा पहारेकरी बनवणं शक्य होणार आहे. अशा कुत्र्यांना कोणतेही ट्रेनिंग न देता त्यांना पहारेकरी बनवता येणार आहे. कारण या जॅकेटमध्ये एक व्हिडीओ कॅमेरा बसवण्यात आला आहे. सेन्सर असल्याने कुत्र्याने भुंकायला सुरूवात केली की जॅकेटमधला कॅमेरा आपोआप सुरू होईल आणि त्याचं रिअल टाइम रेकॉर्डिंग घरबसल्या कंम्प्यूटर किंवा मोबाइलवरून पाहता येणार आहे.
केवळ वासाच्या आधारे गुन्हेगाराला ओळखण्याची भन्नाट क्षमता कुत्र्यांमध्ये असते. त्यामुळे या नव्या जॅकेटचा फायदा पोलिसांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. कारण गुन्हेगारांना ओळखून त्यांना तुरूंगात टाकण्याचं त्यांचं काम अगदी सोपं होणार आहे. याशिवाय शहरातील गुन्हेगारीला मोठ्या प्रमाणात आळा बसण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
पाहा व्हिडीओ -
These dogs are on a mission to fight crime in Bangkok. pic.twitter.com/psIGgH2ZEa
— Al Jazeera English (@AJEnglish) September 26, 2017